हनुमान म्हणजे राक्षसी देव...; ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America news in marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेला (America) जगातली सर्वात विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते. देशातील रोजगार, राहणीमानाची सोय, आर्थिक ताकद, लष्करी शक्ती यांसरख्या गोष्टींमुळे अमेरिका हा अत्यंत महत्त्वपूर्ण देश मानला जातो. पण गेल्या काही काळात येथील काही लोकांच्या भारताबद्दलची मानसिकता बदलली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पाहा ना. कधी भारताचे गुनगाण करणारे ट्रम्प अलीकडे भारतविरोधी धोरणांचा अवलंब करत आहेत. यामुळे संपर्ण जगभरात गोंधळ सुरु आहे.
दरम्यान याच वेळी त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील निकटवर्तीयांनी देखील अनेक भारतविरोधी विधाने केली आहे. नुकतेच त्यांच्या एका जवळच्या सहकार्याने टेक्सासमधील भगवान हनुमानाच्या मुर्तीवर वादग्रस्त विधान केले असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे.
Donald Trump : गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? ट्रम्प यांच्या दाव्यामुळे जागतिक तणावात वाढ
अमेरिकेच्या टेक्सास राज्या भगवान हनुमानाची ९० फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ द युनियन म्हणून ओळखली जाते. या मुर्तीवर रिपब्लिकन पक्षाच्या अलेक्झांडर डंकन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अलेक्झांडरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, आपण आपल्या टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवाची खोटी मूर्ती का उभारत आहोत? आपण एक ख्रिश्चन राष्ट्र आहोत. या विधानामुळे अमेरिकेतील हिंदूंमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. केवळ अलेक्झांडरच नाही, तर अनेक स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील हनुमान भगवंताच्या मुर्तीला डेमॉन गॉड म्हटले आहे.
Hello @TexasGOP, will you be disciplining your senate candidate from your party who openly contravenes your own guidelines against discrimination—displaying some pretty sordid anti-Hindu hate—not to mention disrespect for the 1st Amendment’s Establishment Clause? https://t.co/5LItlu7Zu2 pic.twitter.com/oqZkZozUBR — Hindu American Foundation (@HinduAmerican) September 22, 2025
दरम्यान अलेक्झांडर डंकनच्या या विधानावर अमेरिकेतील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. डंकनच्या या विधाना हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर म्हणून संबोधले आहे. तसेच या प्रकरणावर औपचारिकपण कारवाईची मागणी देखील केली जात आहेत. अनेक भारतीय हिंदूनी, हे विधान भारतीय हिंदूविरोधात द्वेष पसरवणारे आणि त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचणारे असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी डंकन यांना ट्रोल केले आहे.
अमेरिकेत हिंदू समुदाय आणि अमेरिकन लोकांमध्ये का सुरु आहे वाद?
अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते अलेक्झांडर डंकन यांनी टेक्सासमधील भगवान हनुमानाच्या मूर्तीवरुन वादग्रस्त विधान केले आहे. हमुमान भगवानांना त्याने खोटे म्हटेल आहे. यामुळे अमेरिकेत वाद उफळला आहे.
अलेक्झांडर डंकन यांच्या विधानावर हिंदू समुदायाने काय प्रतिक्रिया दिली?
डंकन यांच्या विधानावर अमेरिकेतील हिंदू समुदायाने संताप व्यक्त केला असून त्यांचे विधान हिंदूविरोधी द्वेष पसरवणारे आणि त्यांच्या धार्मिक भावनांना दुखवणारे असल्याचे म्हटले आहे.