ऑफिसमध्ये लंच टाइममध्ये करा रोमान्स, मूल झाल्यास सरकार देणार लाखोंचं बक्षीस (फोटो सौजन्य-X)
घसरणारा जन्मदर रोखण्यासाठी एखादा देश किती पुढे जाऊ शकतो याचे रशिया हे उदाहरण आहे. रशियामध्ये एक विचित्र योजनेला सुरुवात करणार असून ऑफिसमध्ये आता लंच टाइममध्ये रोमान्स करण्यासाठी आणि मूल जन्माला घालण्यासाठी लाखो रुपये मिळणार आहे. नक्की ही योजना काय आहे जाणून घेऊया…
आता रशियन ऑफिसमधील लोकांकडे काम करण्याबरोबरच मुलेही जन्माला देण्याचे काम असणार आहे. याचा अर्थ असा की, आता त्यांना ऑफिसमध्ये रोमान्स करण्यास सांगितले जात आहे आणि त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेचा वापर करून मूल जन्माला देण्याचा प्रयत्न ही करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर मुलाला जन्म दिल्यावर त्यांना मोठी रक्कमही मिळणार आहे. रशियन सरकार हा मुद्दा इतका गांभीर्याने घेत आहे की ते यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करणार आहे.
हे सुद्धा वाचा: शत्रू देशांनो सावधान! रशिया भारताला देणार ‘ही’ खतरनाक शस्त्रप्रणाली; काय आहेत वैशिष्ट्ये? पहाच
खरं तर, रशियामधील जन्मदर चिंताजनक पातळीवर कमी झाला आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. या कारणास्तव, रशियन अधिकारी केवळ जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑफिसमध्ये रोमान्स आणि जोडप्यांसाठी बक्षिसे दिली जात आहेत. दुपारच्या जेवणाच्या वेळी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यातून मूल जन्माला आले तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल.
खरं तर, रशियन तरुण मुले जन्माला देण्यात फारसा रस घेत नसल्यामुळे संपूर्ण रशिया चिंतेत आहे. त्यामुळे बाळंतपणाला चालना देणाऱ्या अशा योजना शासनस्तरावर केल्या जात आहेत. रशियन सरकार पहिल्या तारखेसाठी जोडप्यांना 5,000 रूबल (रु. 4,302) देईल. मुलाला जन्म दिल्यावर तुम्हाला ९.५ लाख रुपये मिळतील अशी घोषणा देखील रशियन सरकारने केली आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाचा जन्मदर एका चतुर्थांश शतकातील सर्वात कमी पातळीवर गेला आहे. रशियन मीडियानुसार रशियामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या जूनमध्ये 6 टक्क्यांनी घटून 98,600 झाली आहे. मासिक जन्मदर 1,00,000 च्या खाली गेल्यावर हे प्रथमच घडले. देशाच्या भवितव्यासाठी हा विनाशकारी दिवस असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले.
रशियन अधिकारी घरातही रोम्यान्स प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. या अंतर्गत लोकांनी रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत घरातील इंटरनेट आणि दिवे बंद करावे आणि आपल्या जोडीदाराशी जवळीक वाढवावी, जेणेकरून रशियाची लोकसंख्या वाढण्यास मदत होईल अशी सूचना केली जात आहे. जोडप्यांना त्यांच्या प्रेम सत्रात त्रास होऊ नये म्हणून इंटरनेट बंद करण्याची सूचना केली जात आहे. जगातील अनेक देश अशा समस्यांशी झुंज देत आहेत आणि आपल्या नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. म्हणूनच एस्टोनियामधील कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या संख्येवर आधारित पैसे दिले जातात. जपानमध्ये चौथ्या मुलाच्या जन्मावर 5.5 लाख रुपये मिळतात. चीनमध्येही अधिक मुले असलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
हे सुद्धा वाचा: रशियाचा युक्रेनवर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ग्लाइड बॉम्बद्वारे जोरदार हल्ला; 6 ठार 30 हून अधिक जखमी