Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची नवी रणनीती! अणुयुद्धाची भीती दाखवत जगासमोर पुन्हा उपस्थित केला काश्मीरचा मुद्दा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तान आणि भारतातील तमाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून वारंवार धमक्या येत असताना दुसरीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर मुद्दा जागतिक स्तरावर उपस्थित करत आग लावण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान यांनी जागतिक समुदायाला काश्मीर वाद सोडवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वादाचे मूळ कारण काश्मीर आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध पूर्णत: तुटण्याचे मूळच काश्मीर आहे. अशा परिस्थितीमध्ये काश्मीरचा मुद्दा सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. हा प्रश्न सुटला तरच भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
रिजवान सईद यांनी शेख यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान वादावर लक्ष खेचण्याचा प्रयत्न केला. रिजवान यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी काश्मीर समस्या सोडवली तर ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची कामगिरी मानली जाईल. सईद यांनी भारत आँणि पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी काश्मीर वाद सोडवण्याचे आवाहन केले. काश्मीर वाद हा आण्विक वादाचा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे अणुयुद्ध होऊ शकते असे सईद यांनी म्हटले.
गेल्या काही काळापासून भारताच्या कारवाई पाकिस्तान बिथरला आहे. तसेच लष्करी कावाईच्या भीतीने पाकिस्तान पहलगामच्या हल्ल्याची स्वतंत्र्य चौकशीची मागणी संयुक्त राष्ट्रांमध्ये केली आहे. याच वेळी पाकिस्तानने नवी खेळ खेळत पुन्हा एका काश्मीर मुद्द्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, काश्मीरमध्ये तणाव वाढत आहे. यामुळे जागतिक समुदायांनी याकडे लक्ष दिले पाहिज. शांततेकडे वाटचाल करायची असेल तर पहिल्यांदा काश्मीर वाद सोडवला पाहिजे. काश्मीरच्या वादामुळे अणुयुद्धाचा धोका वाढत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यत ती पावले उचलावीत.
सईद यांनी म्हटले आहे की, भारताने पहलगाम हल्ल्यावर कोणत्याही पुराव्यासह पाकिस्तानवर आरोप केले आहेत. तसेच भारताकडून हल्ला झाल्यास अणुयुद्धाची शक्यता नाकरता येत नाही असे सईद यांनी म्हटले. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानीची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सईद यांनी पाकिस्तानला शांतता आणि स्थिरता हवी असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीसाठी विनंती करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने सिंधू नदीवर कोणतेही धरण बांधले किंवा पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर हल्ला करण्यात येईल. पाकिस्तानकडू अशा धमक्या वारंवार येत आहेत. यामुळे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण स्पष्टपणे उघड होत आहे.