रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केले 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे कौतुक; भारतात प्रकल्प उभारण्यास दर्शवली तयारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारताचा डंका पुन्हा एकदा जगभरात वाजला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे कौतुक केले आहेत. पुतिन यांनी भारतीय आर्थिक उपक्रमांचे विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाचे कौतुक केले आहे. पुतिन यांना भारताच्या लघु उद्योगांसाठी तसेच मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) स्थिर परिस्थिती निर्माण करण्याच्याभारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
तसेच त्यांनी बुधवारी (4 डिसेंबर 2024) मॉस्को येथे झालेल्या VTB गुंतवणूक मंचावर भाषण करताना पुतिन यांनी रशियाच्या आयात प्रतिस्थापन कार्यक्रम आणि भारताच्या “मेक इन इंडिया” उपक्रमामधील साम्ये स्पष्ट केली. याशिवाय, व्लादिमिर पुतिन यांनी, रशिया भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे भार-रशिया संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने एक पाऊल उचलेले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रशिया भारतात प्रकल्प उभारण्यास तयार
पुतिन म्हणाले की, भारताचे नेतृत्व देशाच्या हिताला प्राधान्य देण्याच्या धोरणावर केंद्रित आहे. “पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘मेक इन इंडिया’ नावाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. आम्हीही भारतात आमचे उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी तयार आहोत. भारताचे पंतप्रधान स्थिर परिस्थिती निर्माण करत आहेत आणि हेच कारण आहे की भारतात गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे,” असे व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे.
रशियन उत्पादन आणि ब्रँडचेही कौतुक
याशिवाय, पुतिन यांनी रशियन उत्पादन आणि ब्रँडचेही कौतुक केले. त्यांनी एसएमईच्या विकासासाठी ब्रिक्स देशांमधील सहकार्याच्या गरजेवर भर दिला आणि ब्रिक्स+ देशांमध्ये एसएमईसाठी विवाद निवारणासाठी वेगवान प्रक्रियांची आवश्यकता व्यक्त केली. पाश्चिमात्य ब्रँडच्या जागी स्थानिक रशियन उत्पादने आणि उच्च-तंत्रज्ञान, आयटी आणि कृषी क्षेत्रातील यशस्वी निर्मात्यांचे त्यांनी उदाहरण दिले.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
देशांमधील सहकार्य वाढवण्याचे आवाहन
व्लादिमिर पुतिन यांनी ब्रिक्स देशांतील सहकार्य वाढवण्याच्या मुद्यांवर देखील आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या तयारीवर भर देत सदस्य देशांनी सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांचा अभ्यास करावा, असे सुचवले. “ब्राझीलच्या सहकाऱ्यांकडून पुढील अध्यक्षीय कार्यकाळात या सहकार्यावर विशेष लक्ष दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.पुतिन यांच्या या वक्तव्याने भारताच्या जागतिक पातळीवरील वाढत्या महत्त्वावर पुन्हा प्रकाश टाकला आहे.
पुतिन यांचा 2025 मध्ये भारत दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भारत भेटीचे औपचारिक आमंत्रण दिले आहे. अशी माहिती क्रेमिनलचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुतिन 2025 च्या सुरूवातीला भारताला भेट देतील. या भेटीचा उद्देश भारत आणि रशिया मजबुत करण्याचा आहे असे त्यांनी सांगितले. रशिया-भारत संबंध सुधारतील अशा अपेक्षा या भेटीद्वारे ठेवण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशाच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.