Venezuela Earthquake : भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार; तब्बल ४,३३३ लोकांचा बळी, हजारो जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भूकंपावेळी आणि भूकंपानंतर हजारो इमारती जमिनीदोस्त झाल्या आहे. यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत इमारतींच्या ढिगाऱ्याखालून ६,४६२ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच विस्थापित नागरिकांसाठी देशभरात तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. १८ हजारांहून अधिक लोक सध्या या छावण्यांमध्ये राहत आहेत.
सध्या सरकार आणि बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य राबवत असून त्यांच्या मदतीसाठी जवळपास ३० हजार स्वयंसेवक पुढे सरसावले आहेत. अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण या स्वयंसेवकांकडून केले जात आहे. नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती आणि नव्या घरांच्या उभारणीसाठी सर्वजण सहभागी झाले आहेत.
भूकंपर्गस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारने युनिफाइड हाउसिंग रजिस्ट्री विशेष नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. यातून बाधिक कुटुंबाची माहिती गोळा करुन त्यांना आर्थिक मदत आणि कायस्वरुपी निवास उपलब्ध करुन देण्याची योजना आखण्यात आली आहे.
पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली घरे पुन्हा उभारली जाणार आहेत. तर नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती केली जाणार आहे. तोपर्यंत अनेक कुटुंबांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.
तसेच भूकंपग्रस्तांसाठी जगातील अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. राजधानी काराकसमधील मदत केंद्रात २ हजार टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मतदसाहित्य पोहोचवण्या आले आहे. सरकार परदेशात अडकलेला निधीही मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
ज्यामुळे लोकांच्या पुनर्वसन आणि घरांच्या पुनर्बांधणीची कामे वेगाने होतील. सध्या संपूर्ण व्हेनेझुएला संकटातून सावरण्यासाठी सरकार, स्वयंसेवक आणि आंतरराष्ट्रीय मदतीच्या बळावर प्रयत्न करत आहे.
या घटनेचा फटका केवळ व्हेनेझुएलाच्या नागरिकांनाच नव्हे तर पर्यटकांनाही बसला आहे. या भूकंपाक पोर्तुगालचे ७१ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. पोर्तुगीज सरकारने यावर दु:ख व्यक्त केले आहे.
Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु






