फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी एक मोठा आत्मघाती हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या ह्ल्यामध्ये किमान 8 जण ठार झाले. या हल्ल्यात चार पोलीस, दोन सैनिक आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील मीर अली तहसीलमधील अस्लम चेक पोस्टवर हा हल्ला करण्यात आला. अशी माहिती पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हल्ल्याचा तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तीन चाकी वाहनांवर स्वार झालेल्या हल्लेखोरांनी चेक पोस्ट आणि सुरक्षा दलाच्या वाहनांना धडक दिली. हल्ल्यात इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना मीरान शाह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी हल्ला झाले परिसरात बंदी घातली आहे. हे हल्ले कोणी केले याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- खळबळजनक! डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस यांचा फोन डेटा हॅक; अमेरिकेचा चिनी हॅकर्सवर आरोप
व्हर्नर फैसल करीम कुंडी यांनी हल्ल्याचा निषेध केला
खैबर पख्तुनख्वाचे गव्हर्नर फैसल करीम कुंडी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी दहशतवादी संघटनांचा प्रदेशातून नायनाट होईपर्यंत कारवाई सुरू राहील, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनख्वाच्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील चेक पोस्टवर देखील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 10 सुरक्षा जवान शहीद झाले होते आणि तीन जण जखमी झाले होते. डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील दरबान भागात झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच सैनिकांची तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आले. या हल्ल्यातील सुरक्षेच्या घटनांमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
2021 मध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ
खतहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या भागात सक्रिय आहे. पाकिस्तानने टीटीपीवर अफगाणिस्तानमधील सुरक्षित आश्रयस्थानातून कारवाया करण्याचा आरोप केला आहे. 2021 मध्ये काबूलमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी झालेल्या हल्ला 48 तासांत दुसरा मोठा हल्ला झाल्याने पाकिस्तानात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे आणि अशा हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानी सरकारने अशा हल्ल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हे देखील वाचा- अखेर मालदीवचा माज उतरला; भारतीय पर्यटकांना परत येण्यासाठी घातली साद