फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी चीनच्या बहाण्याने भारताशी पंगा घेतल्यानंतर भारतीय पर्यटकांपासून मिळणारे आर्थिक लाभ गमावले होते. परिणामी, मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम झाला. यामुळे आता या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी, मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालदीवने भारतासोबत पर्यटन क्षेत्रातील संभावनांवर चर्चा केली आहे.
भारत सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ- मालदीवचे राष्ट्रपतीचे मोहम्मद मुइज्जू
मिळालेल्या माहितीनुसार, मुइज्जू यांनी त्यांच्या नवी दिल्लीच्या पहिल्या द्विपक्षीय भेटीदरम्यान भारताला ‘सर्वात मोठ्या पर्यटन स्रोत बाजारपेठांपैकी एक’ म्हणून संबोधले. या भेटीदरम्यान त्यांनी आशा व्यक्त केली की अधिकाधिक भारतीय पर्यटक मालदीवला भेट देतील. भारतानेही मालदीवसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील यावर भर दिला आणि सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सहकार्याची ब्लू प्रिंट सादर केली. 2023 च्या उत्तरार्धात आणि 2024 च्या सुरुवातीला आलेल्या कठीण काळानंतर दोन्ही देशांच्या संबंधांनी योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा- इस्त्रायलचे इराणसोबत सीरियावरही हल्ले; लष्करी तळांना केले लक्ष्य
पर्यटन विकासाच्या संधींवर चर्चा
मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी गुरुवारी मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त मुनू महावर यांच्याशी लामू एटोलमधील बरेसाधू आणि गाढू येथील पर्यटन विकासाच्या संधींवर चर्चा केली. राज्य-संचालित पीएसएमने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. फैसल यांनी महावर यांच्यासोबत बरेसाधू आणि गाढू बेटांना भेट दिली आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा जतन करताना पर्यटन विकासाच्या संभाव्यतेवर चर्चा केली.
Visited Baresdhoo and Gaadhoo today as part of our tour in Laamu Atoll. Discussed its potential as a key site for tourism development and how we can unlock new opportunities for growth, while preserving the island’s natural beauty and heritage. pic.twitter.com/jyQ1WgdQ5X
— Ibrahim Faisal (@ifaisalofficial) October 24, 2024
मालदीवचे भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न
फैजल यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘पर्यटन विकासासाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून बरेसाधू आणि गाढूच्या संभाव्यतेवर चर्चा झाली. पर्यटन क्षेत्र आमच्या द्विपक्षीय सहकार्याचे प्राधान्य क्षेत्र आहे आणि ही भागीदारी आणखी वाढवण्यासाठी आम्ही मालदीव सरकारसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत. मालदीवने भारतासोबतचे संबंध सुधारण्यात गुंतले असून, तणावानंतर आपला सर्व अहंकार गमावला आहे. मुइज्जू यांच्या नेतृत्वात मालदीव आता भारतीय पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उत्सुक आहे.
हे देखील वाचा- बोईंगचा सॅटेलाईट अंतराळात तुटला; पृथ्वीच्या कक्षेत पसरला 4300 टन कचऱ्याचा ढिगारा