फोटो सौजन्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स अकाऊंट
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारीबाबत करार करण्यात आला. देशांच्या उपस्थितीत सेमीकंडक्टर क्षेत्रातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांचा भारतीतील प्रवेशाचा मार्ग सोपा होणार आहे. सिंगापूर सरकारने जारी केलेल्या निवेदनात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत कराराची देवाणघेवाण करण्यात आली. या कराराला भारत आणि सिंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम पार्टनरशिप असे नाव देण्यात आले आहे.
‘सेमीकंडक्टर उद्योगाला सहाय्य करणे’
सिंगापूर सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सिंगापूर आणि भारताने मॅन्यूपॅक्चरिंग क्षेत्रात भागीदारी आणि सहकार्यासाठी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.” “या सामंजस्य कराराचा उद्देश भारताच्या वाढत्या सेमीकंडक्टर उद्योगाला पाठिंबा देणे आहे, तसेच सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आणि वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत सहभागी होण्यासाठी संबंधित पुरवठा साखळी इकोसिस्टमला मदत करणे हा आहे.” असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
Semiconductors and technology are important facets of India-Singapore cooperation. This is also a sector where India is increasing its presence. Today, PM Wong and I visited AEM Holdings Ltd. We look forward to working together in this sector and giving our youth more… pic.twitter.com/Bdh8nU1w6Y
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024
भारत आणि सिंगापूर यांच्यात अनेक करार झाले
भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार दोन्ही देश डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करतील. तसेच डीपीआय, सायबर सुरक्षा, 5 G,सुपर कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील. तसेच कामागारांचे कौशल्य आणि डिजिटल डोमेनमध्ये काम करणाऱ्यांच्या कौशल्य वाढवण्यावर दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही सेणीकंडक्टर इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या आंतर्गत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सेमीकंडक्टर क्लस्टर तयार करण्याचे, सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
“व्यापार आणि उद्योग मंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय चर्चा करण्यासाठी, सहकार्याच्या क्षेत्रावरील प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी “पॉलिसी डायलॉग” स्थापन करण्यात येमार आहे. सिंगापूरने सेमीकंडक्टर पर्यावरण यंत्रणा स्थापन केली आहे. तसेच भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या सेमीकंडक्टर कंपन्यांचे एक मजबूत समूह तयार करण्यात आले आहे.