न्यूयॉर्कच्या लॉंग आयंडमध्ये भीषण आग; आपात्कालीन परिस्थिती जाहीर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंडमध्ये भीषण आग पसरल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण आगीमुळे आरपात्कालीन परिस्थीती जाहीर करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरली आहे. आगीमुळे दोन किमीहून अधिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासन आणि आग्नीशन दलाला आग विझवण्यात प्रचंड अडचणी येत आहे.
अद्याप कॅलिफोर्नियातील आगीतून अमेरिका बाहेर पडला नव्हता, त्यात पुन्हा एकादा अमेरिकेला लॉंग आयलंडमधील आगीचा सामना करावा लागत आहे. न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंडमध्ये शनिवारी लागलेल्या भीषण आगीमुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सफोक काउंटीमधील साउथहॅप्टन शहरात आग लागली. त्यानंतर आत्पातकालीन परिस्थीती जाहीर करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, आग दुपारी 1 च्या सुमारास लागली.
घटनेचा व्हिडिओ
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मते शनिवारी दुपारपर्यंत आग दोन मैल पर्यंत पसरलेली होती. आग इतकी भीषण होती की. त्याचा धूर लांब अंतरावरुनही दिसत होते. सध्या याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
BREAKING: Donald Trump is on the golf course while brush fires rage across Long Island.
It’s the same strategy he used when wildfires broke out in both North and South Carolina last week. pic.twitter.com/FMqL8gJHzg
— Gabe Sanchez (@iamgabesanchez) March 8, 2025
सफोक काऊंटीचे कम्युनिकेशन डायरेक्टर मार्टिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वेस्टहॅम्प्टनमधील आग 80% पर्यंक आटोक्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे काम अजूनही सुरू आहे. आगीच दोन व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले असून एक अग्निशमक अधिकारी जखमी झाला.
आग पुन्हा वाढण्याची शक्यता
सध्या आग पसरलेल्या भागात अग्निशमन दलाचे कामकाज सुरु असून अनेक स्थानिक रस्ते आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत. सध्या जोरदार वारे आणि वणव्याच्या धोक्यामुले वेस्टहॅम्प्टन शहरातील रहिवासांना बाहेरील कोणत्याही प्रकारची जाळपोळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अग्निशन आणि बचावपथकाच्या आपत्कालीन सेवांनी, कमी आर्द्रता आणि 30-35 मैल प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. यामुले आगी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.