युरोपमध्ये 4 वर्षानंतर हटवण्यात आली PIA वरील बंदी; पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे पाऊल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिस्तानने तब्बल चार वर्षानंतर इंटरनॅनशल एअरलाइन्सची युरोपमधील पुन्हा एकदा सुरु केली आहे. युरोपियन युनियनच्या विमान वाहतूक सुरक्षा संस्थेने सुरक्षा मानकांवरील बंदी हटवल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी( दि. 10 जानेवरी 2025) युरोपला थेट उड्डाणे पाठवण्यात आली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्म आसिफ यांनी या उड्डाणांचे उद्घाटने केले असून त्यांनी लवकरच पाकिस्तान इतर युरोपीय देशांत उड्डाणे सुरु करणार असल्याचे म्हटले.
बंदी का लागू करण्यात आली होती?
जून 2020 मध्ये, दक्षिण पाकिस्तानच्या कराची येथील विमानतळावर उड्डाण उतरताना PIA च्या एका विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 97 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय विमान सुक्षाविषयक यंत्रणेणे पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची (CAA) कार्यक्षमता आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची क्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. या अपघातामुळे PIA वर युरोपमध्ये बंदी घालण्यात आली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लवकरच होणार ट्रम्प-पुतिन यांची भेट; रशिया म्हणाला ‘आम्ही चर्चेसाठी…’
बंदी उठवल्यानंतर पहिली उड्डाणसेवा
युरोपने बंदी उठवल्यानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोईंग 777 विमानाने आपली पहिली उड्डाणसेवा युरोपसाठी सुरू केली. पॅरिसकडे रवाना झालेल्या या उड्डाणात 330 प्रवासी आणि 14 कर्मचारी सदस्य होते. हे उड्डाण दुपारी 12:10 वाजता रवाना झाले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पाकिस्तानचे नागरी विमान वाहतूक मंत्री ख्वाजा आसिफ, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एअर वाइस मार्शल आमिर हयात आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
PIA साठी महत्त्वपूर्ण पाऊल
चार वर्षांनंतर युरोपमध्ये पुन्हा सेवा सुरू करणे हे पाकिस्तान इंटरनॅशनल साठी मोठे यश मानले जात आहे. या बंदीमुळे पाकिस्तानला आर्थिक आणि प्रतिष्ठेसंबंधी मोठे नुकसान झाले होते. परंतु, EASA कडून सुरक्षा मानकांबाबत सकारात्मक अहवाल मिळाल्यानंतर बंदी हटवण्यात आली.
भविष्यातील योजना
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने आता आपल्या युरोपमधील विमान वाहतूकीचा विस्तार करणार आहेत. सुरुवातीला पॅरिससाठी सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच इतर युरोपीय शहरांसाठीही उड्डाणे सुरू केली जातील. या निर्णयामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याची संधी मिळेल. युरोपमधील सेवा पुन्हा सुरू करणे पाकिस्तानसाठी आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स साठी महत्त्वाचे पाऊल आहे. हे प्रकरण विमानन सुरक्षेच्या महत्त्वावर भर देणारे आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याची गरज अधोरेखित करणारे ठरले आहे.