लवकरच होणार ट्रम्प-पुतिन यांची भेट; रशिया म्हणाला 'आम्ही चर्चेसाठी...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांतच पदाचा कारभार स्वीकारतील. दरम्यान त्यांच्या कार्यकाळात युक्रेन-रशिया तणाव कमी होणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याचवेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालय क्रेमलिनने जाहीर केले आहे की, लवकर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांच्या बैठक होईल. मात्र, ही बैठक 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतरच होईण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुतिन-ट्रम्प बैठकीची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही म्हटले होते की, त्यांची आणि पुतिन यांची बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु, या बैठकीसाठी कोणतीही निश्चित वेळ ठरलेली नाही. क्रेमलिनचे प्रवक्ते यांनी सांगितले की, रशिया नेहमीच चर्चेसाठी तयार आहे. ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे मत मांडण्यात आले असून, ट्रम्प यांनी सांगितले होते कीस, पुतिन युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी त्यांना भेटण्यास इच्छुक आहेत.
रशियावर कडक निर्बंध
रशियाच्या तेल आणि गॅस क्षेत्राशी संबंधित 200 हून अधिक कंपन्या आणि व्यक्तींवर अमेरिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे रशियाला महिन्याला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, अमेरिकेने दोन भारतीय कंपन्यांवरदेखील निर्बंध लादले आहेत.
रशियाचे हल्ले
यूक्रेनने रशियाच्या कब्ज्यात असलेल्या डोनेत्स्कमधील एका सुपरमार्केटवर मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. हल्ल्याचा क्षण एका डॅशकॅम व्हिडिओत कैद झाला, यात सुपरमार्केटवर मोठा स्फोट झाल्याचे दिसते. रशियाच्या अधिकाऱ्यांनी याचा आरोप यूक्रेनवर केला आहे. रशियाने 72 ड्रोनच्या मदतीने यूक्रेनवर रात्रीभर हल्ला केला. यापैकी, 33 ड्रोन नष्ट करण्यात यूक्रेनला यश आले. चेर्निहाइव भागात या हल्ल्यांमुळे काही इमारतींना हानी झाली असून एक नागरिक जखमी झाला आहे.
अतिरिक्त आर्थिक मदत आणि निर्बंध
युरोपियन युनियनच्या सात देशांनी यूक्रेनला 50 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे, त्यापैकी 3.09 अब्ज डॉलर्सची पहिली किश्त जारी करण्यात आली आहे. याशिवाय, जपाननेही रशियावर अतिरिक्त निर्बंध लादण्यास मंजुरी दिली आहे. रशिया-यूक्रेन युद्धाचे परिणाम कमी करण्यासाठी डिप्लोमॅटिक मार्गांचा शोध घेतला जात असून, या चर्चांमुळे काही सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.