भारतासह तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील चमोली येथे तीव्रता 3.3 (File Photo : Earthquake)
इस्लामाबाद: भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका मिळाला आहे. पाकिस्तान सलग तिसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशन सेंटर ऑफ सेमिओलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूंकपाची तीव्र ४.६ इतकी होती. बलुचिस्तानच्या जमिनीखाली १० किलोमीटर खोलीपर्यंत भूकंपाचा धक्का बसला. पाकिस्तानमध्ये या आठवड्यातील हा तिसरा भूकंप आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वी सोमवारी (५ मे) पाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. याची तीव्रता ४.२ इतकी नोदवली गेली होती. एनसीएने दिल्ल्या माहितीनुसार, बलुचिस्तानच्या भूकंपाची खोली १० किलोमीटर खोलीपर्यंत आहे. यामुळे ऑफ्टरशॉकचटी शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच १९ आणि १६ एप्रिल रोजी देखील पाकिस्तानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याची तीव्र ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. ज्याचे केंद्रबिंदू पाकिस्तानच्या उत्तरेस होते.
EQ of M: 4.6, On: 12/05/2025 13:26:32 IST, Lat: 29.12 N, Long: 67.26 E, Depth: 10 Km, Location: Pakistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/x6TpdHyX6U— National Center for Seismology (@NCS_Earthquake) May 12, 2025
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान पाकिस्तानमध्ये वारंवार भूकंप होत आहेत. या भूंकपाची खोली ७० किलोमीटरपेक्षा अधिक होती. भूकंपाने कोणतेही नुकसान झालेले नाही, परंतु पृष्ठभागावर जास्त नुकसान होत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच बलुचिस्तानच्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
एकीकडे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने पाकिस्तानची कोडीं झाली आहे, शिवाय बलुचिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने देखील पाकिस्तानवर हल्ले केले आहेत. स्वतंत्र्य बलुचिस्तानची मागणी करण्यात येते असून पाकिस्तान सरकारला बीएलएने अल्टीमेटम दिला आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई सुरु केली. यामुळे पाकिस्तान चवथाळला होता. भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करुन टाकले. यानंतर पाकिस्तानने संतप्त होऊन भारतावर ड्रोन हल्ले सुरु केले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला. ७ मे पासून त १० मे पर्यंत हा संघर्ष सुरु होता. दरम्यान १० रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोंनी चर्चा झाली. यामध्ये युद्धबंदी आणि शस्त्रसंधीबद्दल चर्चा झाली. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होत चालला आहे, पण तज्ज्ञांनकडून अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.