Thailand Visa : थायलंडचा मोठा निर्णय: भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश थांबवला, आता तुम्ही अशाप्रकारे प्रवेश करू शकता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Thailand visa free entry cancelled for Indians 2026 : बँकॉक, (Bangkok) पट्टाया किंवा फुकेतच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक अत्यंत वाईट आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. थायलंड सरकारने भारतीय नागरिकांसाठी सुरू असलेली ‘व्हिसा-मुक्त’ (Visa-Free) प्रवासाची सुविधा अचानक बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १९ मे रोजी झालेल्या थाई मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नवीन कडक नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर थंडावलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंडने भारतीयांना ६० दिवसांपर्यंत विना-व्हिसा फिरण्याची परवानगी दिली होती, परंतु आता हे धोरण अधिकृतपणे मागे घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता थायलंड वारी करणाऱ्या भारतीयांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Green Card Rule: ग्रीन कार्ड पाहिजे तर आधी मायदेशी फिरा; नियमांत ‘US’चा सर्वात मोठा फेरबदल, वाचा काय होतील परिणाम?
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, पूर्वीच्या ९३ देशांसाठी असलेल्या व्यापक ६०-दिवसांच्या व्हिसा सूट योजना पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या बदलानंतर भारताला आता ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ (Visa on Arrival – VoA) या मर्यादित श्रेणीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, थायलंडने या श्रेणीतील देशांची संख्या ३१ वरून थेट ४ वर आणली आहे. आता या विशेष ४ देशांच्या यादीत भारतासह अझरबैजान, बेलारूस आणि सर्बिया यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, आता भारतीयांना थायलंड विमानतळावर उतरल्यानंतर तिथल्या काउंटरवरून अधिकृत व्हिसा घ्यावा लागेल किंवा प्रवासापूर्वी ई-व्हिसा प्रणालीचा वापर करावा लागेल.
So India loses its visa- free status! India has been removed from Thailand’s general visa exemption (visa-free entry) list as part of a major policy overhaul approved by the Thai Cabinet on May 19, 2026. 54 countries which didn’t need visas earlier have retained their status… https://t.co/LekX97cRgl — @Patralekha2011 পত্রলেখা চ্যাটার্জী (@patralekha2011) May 21, 2026
credit – social media and Twitter
जुलै २०२४ मध्ये थायलंडने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपले नियम अतिशय शिथिल केले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांत थायलंडमध्ये परदेशी नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. थायलंडचे पर्यटन मंत्री सुरासाक फंचरोएनवोराकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक परदेशी नागरिक अंमली पदार्थांची तस्करी, लैंगिक गुन्हे, तसेच योग्य परवान्याशिवाय हॉटेल्स आणि बेकायदेशीर शाळा चालवताना पकडले गेले आहेत. या वाढत्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला आणि देशाच्या सुरक्षेला लागलेले भगदाड रोखण्यासाठी थाई प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. सुरक्षेचे व्यापक पुनरावलोकन केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IvankaTrump : सत्य की तथ्य? ‘ट्रम्पची मुलगी होती निशाण्यावर…’ इराण ‘असा’ घेणार होता सूड; अमेरिकेत कमांडो तैनात
थायलंडने परदेशी प्रवाशांसाठी वेगवेगळ्या श्रेणी तयार केल्या आहेत. अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर आणि अनेक युरोपीय देशांसह ५४ देशांच्या नागरिकांना अद्याप ३० दिवसांची व्हिसा सूट दिली जाणार आहे. तसेच सेशेल्स, मालदीव आणि मॉरिशसच्या पर्यटकांसाठी १५ दिवसांची स्वतंत्र व्हिसा सूट लागू करण्यात आली आहे. मात्र, दुर्दैवाने भारताचे नाव या व्हिसा-मुक्त देशांच्या यादीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
हा नवा आदेश थायलंडच्या अधिकृत ‘रॉयल गॅझेट’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर १५ दिवसांनी पूर्ण देशात लागू होईल. तथापि, जे भारतीय पर्यटक सध्या जुन्या नियमांनुसार आधीच थायलंडमध्ये प्रवास करत आहेत, किंवा नियम लागू होण्याच्या अगदी काही दिवस आधी तिथे पोहोचणार आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नाही. अशा प्रवाशांना त्यांच्या पूर्वीच्या वास्तव्याची मुदत संपेपर्यंत थायलंडमध्ये राहण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नवीन भारतीय प्रवाशाला थायलंडच्या ई-व्हिसा प्रणालीद्वारे अर्ज करून किंवा विमानतळावर ‘व्हिसा ऑन अरायव्हल’चे शुल्क भरूनच देशात प्रवेश करावा लागेल.
Ans: परदेशी नागरिकांकडून होणारे अंमली पदार्थांचे गुन्हे, बेकायदेशीर व्यवसाय आणि मानवी तस्करी यांसारख्या अंतर्गत सुरक्षेच्या कारणांमुळे थायलंडने हा निर्णय घेतला आहे.
Ans: भारतीय नागरिकांना आता थायलंडमध्ये प्रवेश करण्यासाठी विमानतळावर पोहोचल्यावर 'व्हिसा ऑन अरायव्हल' (VoA) घ्यावा लागेल किंवा ऑनलाइन 'ई-व्हिसा'साठी अर्ज करावा लागेल.
Ans: जे पर्यटक आधीच तिथे आहेत, त्यांना त्यांच्या जुन्या मंजुरीच्या मुदतीनुसार ठरलेल्या कालावधीपर्यंत थायलंडमध्ये राहता येईल, त्यांना कोणताही त्रास होणार नाही.






