West Bengal निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक; कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पश्मिच बंगलामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचा पराभव करुन भाजप दणदणीत विजयासह सत्तेत आले आहे. यामुळे बांगलागेशातील जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. याच्या निषेधार्थ हजोर लोक भारतविरोधी घोषणा देत रस्त्यांवर उतरले आहेत. पश्मिच बंगलामधील राजकीय बदल कट्टरपंथीयांना पचलेला नाही.
भारत आणि बांगलादेश सीमा सुमारे २२०० किलोमीटरची विस्तीर्ण सीमा आहे. यामुळे बांगलादेशातील राजकीय घडामोडींचा भारत-बांगलादेश सीमेवर परिणाम होतो. सध्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे सीमेवरील सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी मौलाना इनायतुल्लाह पश्चिम बंगालमधील सत्ताबदलावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज असुक्षित असेल, तर बांगलादेशातील हिंदूनाही सुरक्षा मिळणार नाही. अशा उघड धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मौलानांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना बांगलादेशच्या तारिक रहमान (Tarique Rahman) सरकाकडेही मोठी मागणी केली आहे. भारताशी असलेले व्यापारी आणि राजकीय संबंध तोडून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन राजकीय दबाव निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Anti-India procession in Dhaka!
Islamists brought out a huge procession in Dhaka city after Friday prayers against “persecution of Muslims in India following victory of Bharatiya Janata Party (BJP) in West Bengal elections”. Islamists in Bangladesh, including Jamaat-e-Islami have… pic.twitter.com/YKehx6qSpa — Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) May 22, 2026






