"भारताने मुद्दाम पाणी सोडलं...", झेलम नदीला पूर आल्यानंतर पाकिस्तानचा आरोप; पाकव्याप्त काश्मीरमध्ये अलर्ट जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: शनिवारी (26 एप्रिल) दुपारी झेलम नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने हट्टियन बाला परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच दरम्यान पाकिस्तानने झेलम नदीचे पाणी सोडल्यामुळे पूर आल्याचा आरोप भारतावर केला आहे. परंतु स्थानिक रहिवाशांच्या मते, पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे गरि दुप्पट्टा, माझोई आणि मुझफ्फराबाद सारख्या भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मशिदींमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा नेपाळमध्ये तीव्र निषेध; निदर्शकांनी केली ‘ही’ मोठी मागणी
दरम्यान पाकिस्तानी अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या पूरस्थितीचा आरोप भारतावर लावला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता अनंतानागमधून झेलम नदीमध्ये पाणी सोडले आहे. यामुळे पाणी चाकोठी सीमेवरुन पीओकेमध्ये वाहत आहे. पाकिस्तानने भारताने जाणीपूर्वक केले असल्याचे म्हटले आहे. सध्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पाठिंब्यामुळे तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत.
India released water in the river Jhelum in Hattian Bala area of Muzaffarabad without notice, the Muzaffarabad administration imposed a water emergency. A sudden severe flood occurred in the river Jhelum due to the water entering Chakothi from Anantnag district in Uri😂😂 pic.twitter.com/jSxgBkJOeJ
— Rajiv Ojha राजीव ओझा🇮🇳 (@rajivojha9) April 26, 2025
झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. यामुळे मुजफ्फरबाद प्रशासनाने आणीबाणी लागू केली आहे. लोकांमध्ये घबराट पसरली आहे. उरी येथील अनंकनाग जिल्ह्यातील चकोठी येथे पाणी शिरले आहे. यामुळे झेलम नदीला अचानक पूर आला. प्रशासनाने लोकांना नदीच्या आसपासच्या प्रदेशात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसे जनावरांनाही नदीच्या जवळ जाऊ देउ नये असे सांगण्यात आले आहे. यामुळे जीवत व वित्तहानी होणार नाही. याच वेळी मुझफ्फरबाद जिल्हा प्रशासनाने भारतावर आरोप केला आहे. भारताने नेहमीपेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे झेलम नदीत पूर आला आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दरम्यान पाकिस्तानने या दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधले आहे. तसेच गेल्या अनेक काळापासून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे आरोप आहेत.
यामुळे भारताने पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही तोपर्यंत अनेक कठोर कारवाईचे निर्णय घेतले आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करारा स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिसावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तातील अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानने देखील कॉपी पेस्ट करत असे काही निर्णय घेतले आहेत.पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कंपन्यासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.