रशिया-यूक्रेनमधील नरसंहार थांबणार! एक महिन्याच्या युद्धबंदीवर दोन्ही देशांची सहमती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन/कीव: रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 मार्च रोजी फोनवरुन दीर्घ संवाद साधाला. त्यानंतर बुधवारी (19 मार्च) यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही रशिया-यूक्रेन युद्धावर एक तास संवाद साधला. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव आणि NSA ने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी यूक्रेनच्या वीज प्रकल्पांचे नियंत्रण अमेरिकेला देण्याचे सुचवले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान झेलेन्स्की यांनी म्हटले की,यूक्रेनने युद्ध संपवण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. यूक्रेन उर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचे समर्थन करतो. आम्ही युद्धबंदीसाठी तयार आहोत. यूक्रेनच्या सैन्याला युद्धबंदी लागू करण्याचे आणि इतर तांत्रिक समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्वय राखण्यासाठी यूक्रेन आणि अमेरिका सौदी अरेबियात भेटीसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जागतिक घडामोड संबंधित बातम्या- युद्ध की रणनीती? युक्रेनने युद्धासाठी मांडला आहे बुद्धिबळाचा डाव
Today is another day when Ukraine brings its people back. 175 of our defenders have been released from Russian captivity. Another 22 defenders are returning home through measures beyond exchanges. Among them are severely wounded warriors and those whom Russia persecuted for… pic.twitter.com/r8vI7BiYxn
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) March 19, 2025
पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर 30 दिवस यूक्रेनच्या कोणत्याही उर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्यास सहमती दर्शवली. मीडिया रिपोर्टनुसार, तसेच 30 दिवसांच्या कालवधी दरम्यान यूक्रेन-रशियामधील कैद्यांची देवाण-घेवाण करण्यावरही पुतिन यांनी सहमती दर्शवली. मात्र, रशिया यूक्रेनियन शहरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करत राहू शकतो. तसेच रशियाने या दविसांत यूक्रेनने लष्करी हालचाली थांबवण्याची मागणी केली.