File Photo : kamla harris vs Donald Trump
अमेरिकेमध्ये होत असलेली राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले आणि अचानकच वेगळे वळण आले आहे. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार बनण्यासाठी आवश्यक समर्थन मिळविले आहे. याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल. यासाठी कमला हॅरिस यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहे. दोन दिवसांपूर्वीच जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवत धक्का दिला होता.
आता कमला हॅरिस आणि ट्रंप याच्यांमध्ये सामना
2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता कमला हॅरिस विरुध्द डोनाल्ड ट्रम्प अशी होणार आहे. या अगोदर पक्षामध्येही हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार नव्हत्या पण आता त्यांना पक्षातून समर्थन मिळाले आहे. मागील एका सर्वेक्षणामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये ट्रंम्प हे जो बायडेन यांच्यापेक्षा 5 अंकानी पुढे होते तर कमला हॅरिस यांच्यापेक्षा 3 अंकानी पुढे होते. आता परिस्थिती बदलू शकते.
कमला हॅरिस यांना होऊ शकतो या गोष्टींचा फायदा कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष असताना आर्थिक स्थितीमध्ये सुधार झाला. लोकांची कमाई वाढली. कमला हॅरिस याचे वय ही एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कमला हॅरिस या 60 वर्षांच्या आहेत. डोनाल्ड ट्रंम्प हे 78 वर्षाचे आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वय 82 वर्षे आहे. जो बायडेन यांच्या वयामुळे ही त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल
हॅरिस यांनी निवडणूक प्रचार सुरु केला त्यात त्यांनी ट्रंम्प याच्यावर आरोप केले त्या म्हणाल्या की, माजी राष्ट्राध्यक्ष देशाला मागे घेऊन जाऊ ईच्छितात. ट्रंम्प हे नागरिकांना त्या कालखंडात घेऊ जाऊ ईच्छितात ज्यावेळी अमेरिकेमध्ये नागरिकांना स्वातंत्र्य आणि अधिकार नव्हते. मात्र आम्ही उज्ज्वल भविष्यामध्ये विश्वास ठेवतो ज्यामध्ये सर्व अमेरिकनसाठीचा विचार केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला केवळ उपजीविकेसाठी कमावण्याचीच नाही तर पुढे जाण्याचीही संधी असते.