भारताला शिक्षा द्यायची नाही फक्त रशियाकडून तेल खरेदी करु नका; अमेरिकेने स्पष्ट व्यक्त केली खदखद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India US Relations update: वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि भारतामध्ये रशियान तेल खरेदीवरुन तणाव अजूनही आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर (Tarrif) लादला असून पुन्हा रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे उर्जा मंत्री क्रिस राइट यांनी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी भारताला जगातील इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदीचा सल्ला दिला.
पत्रकार परिषदेत क्रिस राइय यांनी म्हटले की, भारत जगातील कुठल्याही देशाकडून तेल खरेदी करु शकतो, पण रशियाकडून नाही. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेला भारतावर टॅरिफ लादण्याची इच्छा नाही, त्यांना केवळ युक्रेनमधील संघर्ष थांबवायचा आहे. यामुळे रशियावर दबाव आणण्यासाठी भारताला शिक्षा दिली जात आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा भारत आणि रशियामधील तेल खरेदीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
आणखी काय म्हणाले क्रिस?
क्रिस राईट यांनी सांगितले की, अमेरिका आणि भारताचे उर्जा व व्यापरा क्षेत्रात संबंध दृढ होत आहेत. यामुळे भविष्यात यात आणखी वृद्धी होईल. पण यासाठी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी आणि अमेरिकेसोबत मिळून रशियावर निर्बंध लादण्यासाठी नवा मार्ग शोधावा. त्यांनी सांगितले की, नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची त्यांनी भेट घेतली. यावेळीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याचा शेवट व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
भारताला रशियाकडून तेल खरेदीमुळे होतो मोठा नफा
यापूर्वी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचे सल्लागार पीटर नवारो यांनी दावा केला होता की, भारताला अमेरिकेकडून स्वस्त दरात तेल मिळते. यामुळे त्यांच्या देशातील श्रीमंत लोकांना याचा मोठा फायदा होतो, पण सामान्य जनतेला याचा तोटा होता. तसेच रशियाने देखील स्पष्ट केले होते, भारताला रशियन तेलावर ५% सवलत मिळते. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा होतो.
याच वेळी रशियाचे राजनैतिक अधिकारी बाबुश्किन यांनी सांगितले की, रशियाला तेल विक्रीसाठी पर्याया नाही. भारतीय तेल कंपन्यांना फायदा होत असला तरी प्रत्येक देशा त्याच्या हितासाठी हवा तो निर्णय घेऊ शकतो. तसेच अमरिकेचा भारतावरील दबाब चुकाचा आहे. भारताला रशियन पुरवठ्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
FAQs(संबंधित प्रश्न)
अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीवरुन काय सल्ला दिला?
अमेरिकेने भारताला जगातील इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्याची मुभा असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवा, याचा उद्देश युक्रेन संघर्ष थांबवणे आहे असे अमेरिकेने म्हटले.
रशियाकडून भारताला तेल खरेदीमध्ये किती टक्के सवलत मिळते?
रशियाककडून भारतातील तेल कपंन्यांना रशियाच्या कच्चा तेल खरेदीवर ५% सवलत मिळते.