Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपण करतोय मदत? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
चीन(China) च्या लष्करी तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने इराणची मारक क्षमता दुप्पट झाली आहे. अमेरिका-इस्रायलसारख्या महासत्ता देशांना आव्हान देण्यासाठी चीन-इराण (Iran) भागीदारी प्रत्यक्षात युद्धभूमीवर दिसल्याने खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनने इराणला प्रगत संरक्षण तंत्रज्ञान, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि घातक ड्रोन विकसित करण्यासाठी मदत पुरवली आहे. इराणने वापरलेल्या चीनी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रांनी अमेरिकन सैन्यालाही संरक्षण प्रणालीवर त्रुटींवर विचार करण्यास भाग पाडले आहे.
सध्या चीनने इराणला आधुनिक सॅटेलाइट नेटवर्क आणि रिमोट सेंसिंग इमेजरीची प्रणालीही दिली आहे. ज्याच्या मदतीने इराण अमेरिकेच्या बारिक हालचालींवर नजर ठेवून अचूकपणे हल्ले करत आहे. इराणने हाय-डेफिनिशन डेटाच्या मदतीने मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना आणि कमांड सेंटर्गला उद्ध्वस्त करुन टाकले असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय इराणने चीनच्या मदतीने अंतराळ कार्यक्रम आणि रिमोट सेंसिंग सॅटेलाइट्सही अत्याधुनिक बनवले आहेत.
तसेच इराणमधील अनेक चिनी कंपन्या सुरक्षित फायबर-ऑप्टिक नेटवर्क आणि 5g सारख्या डिजिटल डिजिटल तंत्रज्ञानाचा विकासासाठी सध्या संयुक्तपणे कार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२५ नंतर चीनने इराणला आधुनिक रजार यंत्रणा आणि सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. यामुळे इराणची ताकद अत्यंत वाढली अल्यासचे तज्ज्ञांचे मत आहे.
याशिवाय हिंद महासागरात रशिया(Russia)-चीन-इराणने अनेक वेळा संयुक्त नौदल सरावही केला आहे. तसेच ओमानच्या आखातातही तिन्ही देशांनी सराव केला आहे. या सरावामुळे इराणला आधनुिक युद्धनीती आणि तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या मध्यपूर्वेतील युद्धाला एक वेगळेच वळण आले आहे. या युद्धात महासत्ता देशांचा वाढता सहभाग हा जागतिक स्थिरतेसाठी धोकादायक मानला जात आहे.
US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…
Ans: चीनने इराणला लष्कर तंत्रज्ञानाची मदत पुरवली आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, तसेच सॅटेलाइट डेटा आणि सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
Ans: चीनच्या सॅटेलाइट नेटवर्क आणि रिमोट सेन्सिंग डेटामुळे इराणच्या शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे आणि अचूकपणे हल्ले करणे सोपे जात आहे.
Ans: चीन-इराण-रशियामधील संयुक्त नौदल सरावामुळे लष्करी समन्वय वाढत आहे. यामुळे तिन्ही देशांना एकमेकांच्या आधुनिक तंत्रज्ञा अनुभव मिळतो आणि जागतिक स्तरावर या देशांच्या भागीदारीचा संदेश पोहोचतो. यामुळे हे तिन्ही देश संयुक्तपण सराव करतात.






