अमेरिकेची संतुलित प्रतिक्रिया, जग आमच्याकडे पाहत आहे
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांना या विषयावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत, थेट प्रतिक्रिया टाळली. त्यांनी म्हटले की, “आम्ही दोन्ही देशांशी संवाद साधत आहोत. संपूर्ण जग आमच्याकडे पाहत आहे. पण याशिवाय सध्या माझ्याकडे कोणतीही अतिरिक्त माहिती नाही.” या वक्तव्यामुळे अमेरिकेचा दृष्टीकोन स्पष्ट झाला – विषय गंभीर आहे, पण त्यावर भाष्य करताना संयम ठेवण्यात येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणात हे संकेत मानले जात आहेत की, अमेरिका आता पाकिस्तानला पूर्वीसारखा मोकळा पाठिंबा देणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: ‘पुढील 24 तासांत हल्ला होईल…. ‘ पाकचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांचे खळबळजनक विधान
ख्वाजा आसिफ यांचा कबुलीजबाब, पाकिस्तानची बदनामी
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कबूल केलं की, “पाकिस्तान गेली ३० वर्षे दहशतवादाला पोसत आहे आणि हे घाणेरडे काम आम्ही अमेरिकेसाठी करत होतो.” या विधानामुळे पाकिस्तानवर दहशतवादाचा प्रायोजक देश म्हणून लावले जाणारे आरोप अधिक ठोस झाले आहेत. त्यांनी हेही म्हटलं की, भारताशी झालेल्या संघर्षांत लष्कर-ए-तैयबा यासारख्या संघटनांचा उपयोग झाला होता, पण आता ती संघटना नष्ट झाली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अनेक सुरक्षा तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संघटना या दाव्यांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
WILD 🔴
Pakistani Defense Minister answers questions about Pakistan funding terrorists:
“Well, we have been doing this dirty work for United States and west for three decades” pic.twitter.com/cQJvFWwiBa
— Open Source Intel (@Osint613) April 25, 2025
credit : social media
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कारवाई सुरू
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा तणावात आले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार महत्त्वपूर्ण सभा घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीसह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तसेच सुरक्षा सल्लागार सहभागी होतील. या बैठकीत पाकिस्तानविरोधात लष्करी व डिप्लोमॅटिक पातळीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पाकिस्तानची तडफड सुरू, रशिया आणि तुर्कीची मदत मागितली
भारताकडून संभाव्य कारवाईची भीती वाटून पाकिस्तानने तुर्की, रशिया आणि अन्य देशांशी चर्चा सुरू केली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत आहे. अशा वेळी भारताकडून युद्धसदृश कृती झाल्यास, पाकिस्तानची अडचण अधिकच वाढू शकते. पाकिस्तान आताच आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. ख्वाजा आसिफ यांचे दहशतवादाविषयीचे विधान म्हणजे पाकिस्तानचीच कबुली आहे की त्यांनी स्वतः दहशतवाद पोसला आणि त्याचा आता त्यांनाच फटका बसतो आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताकडून हल्ल्याची भीती; पाकिस्तानची लष्करी हालचाल वाढली, हवाई दल सतर्क, सीमा सुरक्षा बळकट
जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटे पडतेय?
ख्वाजा आसिफ यांच्या विधानामुळे पाकिस्तानची जागतिक स्तरावर विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. अमेरिकेच्या प्रतिक्रीयेतून हेच स्पष्ट होतं की, पाकिस्तानला पूर्वीसारखा पाठीशी घालणारा मित्र आता उरलेला नाही. भारत आता या विधानांचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वापर करून पाकिस्तानविरोधात प्रभावी दबाव तयार करू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस दक्षिण आशियातील सामरिक वातावरण अतिशय संवेदनशील राहणार आहे.