Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pak-Afghan War : युद्ध थांबवा नाहीतर…, पाक-अफगाण युद्धवार संतापला चीन; दिला गंभीर इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(२६ एप्रिल) पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकामक झाली होती. यामध्ये ६ पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात भीषण प्रतिहल्ला केल्ला. पाकिस्तानने थेट सयद्द जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठावर हल्ला केला आहे. याशिवाय असदाबादमधील रहिवाशी घरांवरही वांरवार हल्ले सुरुत आहे. जखमींमध्ये विद्यार्थी आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानच्या या कृत्यावर अफगाणिस्तान (Afghanistan) च्या तालिबान सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानन जाणूबुजून नागरी भागांना लक्ष्य करत असल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी केला आहे. या हल्ल्यात ७० जण जखमी झाले असून ४ विद्यार्थ्यंचा मृत्यू झाल्याची माहिती फितरत यांनी सोशल मीडियावरुन दिले आहे. तसेच पाकिस्तानच्या या कृत्याला त्यांनी गंभीर युद्धगुन्हा संबोधले आहे. या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
Today, April 27, 2026, the military regime of Pakistan once again conducted artillery shelling using mortars and rockets against multiple areas of Asadabad, the provincial capital of Kunar, as well as parts of Manogai District.
In these attacks, which commenced at 2:00 PM,… pic.twitter.com/vnpTU2W6be — Hamdullah Fitratحمدالله فطرت (@FitratHamd) April 27, 2026
दरम्यान पाकिस्तानने तालिबानचे सर्व आरोप फेटाळले असून आम्ही कोणत्याही विद्यापाठीवर हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या मते, तालिबानने त्यांच्या एका सैनिकाला ओलीस ठेवले आहे. त्यांची शस्त्रेही जप्त केली आहेत. याप्रत्युत्तरात कारवाई म्हणून सीमेवर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये एका अफगाणी मुलाचा मृत्यू झाला.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव नवीन नाही. २००१ पासून हा वाद सुरु आहे. अफगाण तालिबान आणि टीटीपी विरोधात पाकिस्तानने युद्ध पुकारले आहे. पाकिस्तान खोट्या इस्लामचा प्रचार करतो असे तालिबानचे आरोप आहेत.
गेल्या मार्च महिन्यात दोन्ही देशांमध्ये चीन, कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही आठवड्यातच दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरु केले.
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात भीषण प्रतिहल्ला केल्ला. पाकिस्तानने थेट सयद्द जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठावर क्षेपणास्त्रे डागली आहेत.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(२६ एप्रिल) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकामकीत ६ पाकिस्तानी सैनिकांना ठार झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानवर हल्ला केला.






