दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America on Delhi and Islamabad Blast : वॉशिंग्टन : सोमवारी (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट (Delhi Blast) झाला होता. तर याच्याचय दुसऱ्या दिवशी मंगळवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथेही उच्च न्यायालाबाहेर स्फोट झाला होता. या स्फोटांनी दोन्ही देश हादरले होते. दरम्यान या स्फोटा अमेरिकेची (America) पहिलीच प्रतिक्रिया समोर आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचा दुहेरपण समोर आला आहे.
इस्लामाबादमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने तात्काळ आणि कठोर शद्बांत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तर दिल्लीतील स्फोटावर अमेरिकेने २४ तासानंतर प्रतिक्रिया दिली असून यावर केवळ निवडक शब्दांत शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतावर अत्यंत थंड असा प्रतिसाद अमेरिकेने दिला आहे.
इस्लामाबद स्फोटावर (Islamabad Blast)अमेरिकेच्या दूतावासाने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, संयुक्त राज्य अमेरिका पाकिस्तानसोबत दहशतवादविरोधीच्या लढाईत उभा आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो, तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तसेच अमेरिकेने पाकिस्तानच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे.
The United States stands in solidarity with Pakistan in the struggle against terrorism. Our condolences to the families of those who lost their lives in today’s senseless attack. We wish a swift recovery to those injured. We condemn this attack and all forms of terrorism and… — U.S. Embassy Islamabad (@usembislamabad) November 11, 2025
मात्र, दिल्ली स्फोटाबाबत अमेरिकेचा सूर पूर्णपणे बदलला आहे. अमेरिकेचे नुकतेच नियुक्त झालेले भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये अतिशय थंड अशा शब्दांत म्हटले आहे की, दिल्लीतील भयंकर स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत. तसेच जखमींनी लवकर बरे होवो. या विधानावरुन समजेत की, यामध्ये हल्ल्याला कोणत्या प्रकारच निषेध नाही, तर भारताला कोणताही पाठिंब दिसून येत नाही.
Our thoughts and prayers are with the families of those who were lost in the terrible explosion in New Delhi last night. We wish a swift recovery to those who were injured. – Ambassador Sergio Gor — U.S. Embassy India (@USAndIndia) November 11, 2025
विशेष म्हणजे, अमेरिकेने इस्लामाबाद स्फोटावर तातडीने प्रतिक्रिया दिल्ली, परंतु दिल्ली स्फोटाच्या २४ तासानंतर अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामुळे अमेरिकेचा दुहेरी चेहरा स्पष्टपणे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि भारतातील तणाव हा ट्रम्पच्या व्यापारी धोरणांना विरोध केल्यापासून अधिक वाढला आहे.






