(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लामा यांच्या दौऱ्याची सुरुवात बोधगया येथून झाली आहे. रविवारी गया विमानतळावर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. युनेस्को जागतिक वारसा स्थळ महाबोधी मंदिराला त्यांनी भेट दिली. यानंतर वियतनामी मठालाही भेट दिली.
या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्राध्यक्ष लामा भारताची राजधानी दिल्लीत दाखल झाले आहे. आज (०६ मे) सकाळी त्यांचे राष्ट्रपती भनमध्ये औपचारिक स्वागत करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी ११.३० च्या सुमाराचे हैदराबाद हाऊस येथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतील. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडले.
या दौऱ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण या दौऱ्यात भारत आणि व्हिएयतनाममधील संभाव्य ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावर चर्चा होणार आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस सुपसोनिक क्रूझ मिसाइल खरेदी करण्याची शक्यता आहे. ६० अब्ज डॉलर्सचा हा व्यवहार असेल.
या करारांतर्गत शस्त्रास्त्र नव्हे, तर प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक मदतीचाही समावेश असणार आहे. फिलिपिन्स आणि इंडोनेशियानंतर आता व्हिएतनामसोबत भारत करार करणार आहे. या करारामुळे भारताच्या डिफेन्स एक्सपोर्ट धोरणाला मोठी गती मिळेल.
सध्या भारत आणि व्हिएतनाममधील या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेष करुन चीन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा करार चीनसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. पण हा दौरा भारत आणि व्हिएतनामच्या धोरणात्मक संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Ans: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा अत्यत महत्त्वाचा आहे. भात आणि व्हिएतनाममधील संरक्षण आणि धोरमात्मक सहकार्य अधिकमजबूत करणे आहे. व्यापारासोबतच लष्करी संबंधांना नवी दिशा देण्याचा हेतू आहे.
Ans: या दौऱ्यात भारत आणि व्हिएयतनाममधील संभाव्य ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावर चर्चा होणार आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस सुपसोनिक क्रूझ मिसाइल खरेदी करण्याची शक्यता आहे.






