'Men Will Be Men... ' पीटर नवारो आणि एलोन मस्क यांच्यातील वादावर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया Viral ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरून टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि त्यांचे माजी आर्थिक सल्लागार पीटर नवारो यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. हा वाद इतका तीव्र झाला की मस्कने नवारोला थेट “मूर्ख” म्हटले, ज्यामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर व्हाईट हाऊसनेही प्रतिक्रिया दिली असून, “Men Will Be Men…” असे म्हणत या वादाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लॅविट यांनी हा वाद म्हणजे दोन व्यक्तींच्या वैयक्तिक मतभेदांचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्रंप प्रशासनाच्या टॅरिफ धोरणावरून निर्माण झालेल्या या वादावर पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लॅविट म्हणाल्या, “व्यापार आणि शुल्कासंदर्भात भिन्न मत असलेले हे दोन पुरुष आहेत. त्यांना त्यांच्या चर्चेचा आनंद घेऊ द्या. मुले मुलेच राहतील, त्यांना जे करायचे आहे ते करू द्या!” लॅविट यांनी पुढे स्पष्ट केले की, ट्रम्प प्रशासन पूर्ण पारदर्शकतेने काम करत आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर विविध मतांचा विचार केला जातो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सर्वांना ऐकून राष्ट्रीय हिताचा निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : टॅरिफ शुल्काची वाढ, आर्थिक विकासावर होणार नाही कोणताही मोठा परिणाम; 6.3-6.8 % राहणार जीडीपी वाढ
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावरून मस्क आणि नवारो यांच्यात वादाचा सुरुवात झाली. ट्रम्प प्रशासनाने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्याचा सर्वात मोठा फटका ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञान उद्योगाला बसू शकतो. या धोरणाच्या रचनेत पीटर नवारो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मते, उच्च टॅरिफमुळे बाजार प्रथम अस्थिर होईल, पण नंतर तो लवकरच सुधारेल. त्यांनी असा दावाही केला की, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली डाउ जोन्स ५०,००० अंकांपर्यंत पोहोचू शकतो. या विधानानंतर मस्कने नवारोवर थेट टीका केली.
पीटर नवारो यांच्या मुलाखतीनंतर एलोन मस्क संतापले आणि त्यांनी थेट ट्विट करून लिहिले
The White House is reacting to the feud between Elon Musk and President Trump’s trade advisor Peter Navarro.
“Obviously these are two individuals who have very different views on trade and tariffs. Boys will be boys and we will let their public sparring continue.”
Musk in a X… pic.twitter.com/pPpe9LzTU2
— Breanna Morello (@BreannaMorello) April 8, 2025
credit : social media
“हार्वर्डमधून अर्थशास्त्रात पीएचडी करणे ही चांगली गोष्ट नाही, तर वाईट गोष्ट आहे!”
मस्क यांच्या मते, उच्च टॅरिफमुळे अमेरिकी कंपन्यांना जागतिक स्तरावर मोठे नुकसान होईल. मस्क याआधीही युरोप आणि अमेरिकेतील व्यापारावरील कर कमी करण्याच्या बाजूने बोलले आहेत. ते मुक्त व्यापाराचे समर्थन करतात आणि त्यांच्या मते, शून्य टॅरिफ पॉलिसीमुळे अमेरिका आणि युरोप यांच्यातील व्यापार अधिक सुलभ होईल. परंतु, ट्रम्प प्रशासनाने युरोपियन युनियनवर २०% कर लावला, ज्यामुळे मस्क आणखी नाराज झाले.
हा वाद केवळ वैयक्तिक मतभेदांपुरता मर्यादित नाही, तर हा व्यापार आणि अर्थशास्त्राच्या दोन वेगळ्या दृष्टिकोनांचा संघर्ष आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : चिनी सैन्याच्या हालचालीने जागतिक गोंधळ, VIDEO व्हायरल!
एलोन मस्क आणि पीटर नवारो यांच्यातील हा संघर्ष केवळ ट्विटरपर्यंत मर्यादित राहील का, की त्याचा अमेरिकेच्या व्यापार धोरणावर परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्हाईट हाऊसने हा वाद गंभीर न मानता त्याकडे ‘दोन पुरुषांचे मतभेद’ म्हणून पाहण्याचा सल्ला दिला असला तरी, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मोठे खेळाडू याकडे गांभीर्याने पाहत आहेत. मस्क आपल्या परखड आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात, त्यामुळे हा वाद येत्या काही दिवसांत अजून तीव्र होऊ शकतो. अमेरिकेच्या व्यापार धोरणावर आणि जागतिक बाजारावर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
credit : social media and YouTube