Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियाची ताबिलानविरोधात मोठी कारवाई; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास अन् आर्थिक बंदी, कारण काय?
सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु असून या आगीत एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारी (०७ डिसेंबर) रात्री ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये बुलाहडेलाह शहराजवळील जंगलाला ही आग लागी. या वेळी आग विझवताना एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे जवळपास ३, ५०० हेक्टर जळून खाक झाले आहेत. यामध्ये अनेक घरे नष्ट झाली आहे. काही अग्निशमन अधिकारी जखमी देखील झाले आहेत. न्यू साऊथमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शहरातील ५२ ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे. आग अनियंत्रित झाली असून अग्निशमन अधिकाऱ्यांना ती विझवण्यास कठीण जात आहे. वेल्समधील २० घरे जळून खाक झाली आहेत.
सरकारने आग आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. लोकांना घरापासून दूर सुरक्षित ठिकाणी किंवा इतर शहरांतील नातेवाईकांकडे राहण्यास सांगण्यात आले आहे.
🌪️🔥Australia is facing a real natural disaster — massive wildfires have engulfed the country More than 50 fires are burning along the southeast coast, especially in New South Wales. The highest level of evacuation readiness has been declared. 1,500 firefighters and 300 units… pic.twitter.com/wiujdg6EF5 — NEXTA (@nexta_tv) December 7, 2025
यापूर्वी ऑस्ट्रेलियात २०१९ मध्ये अशीच भीषण आग लागली होती, जी २०२० पर्यंत चालू राहिली होती. या विनाशकारी वणव्यात सुमारे १.८ दशलक्ष हेक्टर जळून खाक झाले होते. यामुळे लाखो प्राणी प्रभावित झाला होता. हजारो घरे नष्ट झाली होती. ही ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात भीषण आग मानली जाते.
Ans: ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये बुलाहडेलाह शहराजवळील जंगलाला भीषण आग लागली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियात न्यू वेल्समध्ये लागलेल्या आगीत एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ३५०० हेक्टर जळून खाक झाले आहे,






