ऑस्ट्रेलियाची ताबिलानविरोधात मोठी कारवाई; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास अन् आर्थिक बंदी, कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ६२ व्या वर्षी थाटला संसार; १७ वर्षांनी लहान मुलीशी केले लग्न
गेल्या काही काळात तालिबान सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. अफगाण महिलांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. यामध्ये महिलांना शिक्षण घेण्यास बंदी आहे, तसेच त्यांना मिळणारे नर्सिंगचे शिक्षणही बंद करण्यात आले आहे. तसेच अफगाण महिलांना मिडवाइफरी ( दाई) म्हणून काम करण्यास आणि नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. अशा प्रकारचे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे अनेक नियम तालिबान सरकारने महिलांवर लागू केले आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने महिला आणि मुलींवरील वाढत्या दडपशाहीविरोधातच तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध लागले आहे. शनिवारी (६ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने सरकारने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनता ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, तालिबान सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक निर्बंध आणि प्रवास बंदी लागू केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये सततच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात हा निर्णय घेण्यात आले असल्याचे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
तालिबान सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतेच एक नवा कायदा लागू केला आहे. हा कायदा ऑस्ट्रेलिया सरकारला एखाद्या परदेशी अधिकाऱ्यावर थेट आर्थिक आणि प्रवास बंदी लागू करण्याची परवानगी देतो. या कायद्याअंतर्गत ऑस्ट्रेलियाने आपल्या नागरिकांवर दडपशाही आणि निर्बंधाचा भार टाकणाऱ्या तालिबानविरोधात ही कारवाई केली आहे.
तालिबान सत्तेत आल्यानंतरची अफगाणिस्तानमधील परिस्थिती
ऑगस्ट २०२१ मध्ये पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेतले. यानंतर लगेचच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. सध्या तालिबान सरकारने महिला आणि मुलींच्या हक्कांवर कठोर निर्बंध लागले आहे. मुलींसाठी शिक्षणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना काम करण्यास, पालकांशिवाय घराबाहेर पडण्यासही मनाई आहे. यामुळे जगभरातील मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या महिलांवरील निर्बंधांना मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून संबोधले आहे.
तालिबान सत्तेत आल्यानंतर अनेक अफगाण नागरिकांनी देश सोडला होता. यावेळी काहींनी ऑस्ट्रेलियात आश्रय घेतला होता. यातील बहुतेक महिला आणि मुलींना आश्रय देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने नेहमीच मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्यांचा विरोधा केला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने तालिबान सरकारविरोधात ही कारवाई केली आहे.
Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक
Ans: ऑस्ट्रेलियाने तालिबानच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास बंदी आणि आर्थि निर्बंध लागू केले आहेत.
Ans: ऑस्ट्रेलिया सरकारने महिला आणि मुलींवरील वाढत्या दडपशाहीविरोधातच तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध लागले आहे.






