World Malaria Day : मलेरियाचा 'द एंड' निश्चित! विज्ञानाने शोधली अशी लस की डासांची दहशत संपणार; पाहा विशेष रिपोर्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World Malaria Day 2026 : दरवर्षी २५ एप्रिल रोजी आपण ‘जागतिक मलेरिया दिन’ (World Malaria Day 2026) साजरा करतो. पण २०२६ मधील हा दिवस अधिक खास आहे. कारण, आता आपण केवळ आजाराबद्दल बोलत नाही, तर तो मुळापासून उपटून टाकण्यासाठी आपल्याकडे प्रगत शस्त्रे उपलब्ध झाली आहेत. एकेकाळी लाखो लोकांचा बळी घेणारा हा आजार आता विज्ञानासमोर शरणागती पत्करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यंदा स्पष्ट संदेश दिला आहे की, “मलेरिया संपवणे आता आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet
भारताने २०१५ च्या तुलनेत मलेरियाच्या प्रकरणांमध्ये जवळपास ८०% घट नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामरिक योजनेनुसार (NSP), २०२७ पर्यंत भारतातून मलेरियाचा स्थानिक प्रसार पूर्णपणे थांबवण्याचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे, भारतातील ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘नॅशनल पॅरासाईट इन्सिडन्स’ १ पेक्षा कमी राखण्यात यश मिळवले आहे. तरीही शहरी भागातील दाट वस्ती आणि सीमावर्ती भागातील आव्हाने अजूनही कायम आहेत, ज्यावर आता कडक पाळत ठेवली जात आहे.
Malaria remains a major public health burden in the African Region, affecting millions and claiming lives every year. But it is preventable and treatable. Proven tools like insecticide-treated mosquito nets continue to reduce transmission and protect communities. With… pic.twitter.com/f4UML26Gd6 — WHO African Region (@WHOAFRO) April 23, 2026
credit – social media and Twitter
मलेरियाविरुद्धच्या लढाईत ‘R21/Matrix-M’ ही नवीन लस गेमचेंजर ठरत आहे. ही लस केवळ स्वस्तच नाही, तर लहान मुलांमध्ये मलेरियाचा धोका ७०% पेक्षा जास्त कमी करते. याशिवाय, आता केवळ साधा कीटकनाशकाचा फवारा नाही, तर लांब काळ टिकणाऱ्या औषधयुक्त मच्छरदाण्या (LLINs) आणि घरात केल्या जाणाऱ्या फवारणीमुळे डासांचा नायनाट करणे सोपे झाले आहे. शास्त्रज्ञ आता अशा औषधांवर काम करत आहेत, ज्यामुळे केवळ एका गोळीने मलेरिया बरा होऊ शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: कोण म्हटलं माकड इराणच्या बाजूने? होर्मुझमोहिमेवर जाणाऱ्या US Navyच्या सैनिकासोबत घडले ‘असे’ विपरीत अन् तो चक्क…
मलेरिया हा ‘अॅनोफिलीस’ जातीच्या मादी डासामुळे पसरतो. थंडी वाजून ताप येणे, प्रचंड घाम येणे, डोकेदुखी आणि उलट्या होणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. जर वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. प्रतिबंधासाठी घरातील आणि परिसरातील साचलेले पाणी काढून टाकणे, पूर्ण कपडे घालणे आणि खिडक्यांना जाळ्या बसवणे हे उपाय आजही सर्वात प्रभावी आहेत. मलेरिया मुक्त होणे हे केवळ आरोग्यासाठी नाही, तर देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही आवश्यक आहे, कारण यामुळे होणारा मजुरीचा तोटा आणि उपचाराचा खर्च वाचणार आहे.
Ans: यंदाची थीम "Driven to End Malaria: Now We Can. Now We Must" ही असून, उपलब्ध साधनांच्या मदतीने मलेरियाचा पूर्णपणे खात्मा करण्यावर यात भर दिला आहे.
Ans: भारताने २०२७ पर्यंत स्थानिक प्रसार रोखण्याचे आणि २०३० पर्यंत संपूर्ण देशाला मलेरियामुक्त करण्याचे अधिकृत उद्दिष्ट ठेवले आहे.
Ans: WHO ने RTS,S आणि R21 या दोन मुख्य लसींना मान्यता दिली असून, प्रामुख्याने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांचा वापर जगभरात केला जात आहे.






