शी जिनपिंग यांनी इमॅन्युएल मॅक्रॉनसोबत दुर्मिळ भेट दिली. चीन रशियाचा कट्टर शत्रू फ्रान्सला का आकर्षित करत आहे? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
1.तैवानच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय संतुलन बदलण्याचा डाव.
2.घटलेल्या व्यापाराला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न.
3.युरोपियन टीका कमी करण्यासाठी फ्रान्समार्फत नवा मार्ग.
Xi Jinping Macron meeting 2025 : शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कोणत्याही परदेशी राष्ट्रप्रमुखासोबत चीनच्या मुख्य महानगरांपासून दूर असलेल्या चेंगडूसारख्या ठिकाणी संयुक्त दौरा केल्याने ही भेट ऐतिहासिक आणि दुर्मिळ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या मते, २०१२ नंतर शी यांनी कोणत्याही नेत्याला असा विशेष मान दिलेला नव्हता. त्यामुळे फ्रान्स आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे चीनसाठी सध्या किती महत्त्वाचे ठरत आहेत, हे अधोरेखित होते. रशियाचा जवळचा मित्र असूनही, रशियाच्या कट्टर विरोधकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फ्रान्ससोबत चीनने हा संवाद उघडाच ठेवलेला आहे, ही बाब जागतिक राजकारणात नवी समीकरणे तयार करत असल्याचे दिसते.
यामागचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तैवानचा मुद्दा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील पाच स्थायी सदस्यांपैकी सध्या चीनला स्पष्ट पाठिंबा फक्त रशियाकडून मिळत आहे, तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स हे तैवानच्या बाजूकडे झुकलेले आहेत. अशा परिस्थितीत, फ्रान्सला आपल्या बाजूला वळवण्यात चीनला यश मिळाले, तर शक्ती-संतुलन ३ विरुद्ध २ असे होऊ शकते. तसे झाल्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचा आवाज अधिक प्रभावी ठरू शकतो. या पार्श्वभूमीवरच शी जिनपिंग यांनी मॅक्रॉन यांना विशेष मान देत, दुर्मिळ दौऱ्यावर नेल्याचे स्पष्ट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin India Visit: ‘ना भारत झुकणार, ना रशिया तुटणार’, पुतिन यांच्या भारत भेटीचा चीनमध्ये गाजावाजा; वाचा नक्की काय म्हटले?
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे घटलेला द्विपक्षीय व्यापार. २०२४ मध्ये चीन आणि फ्रान्स यांच्यातील व्यापारात घट नोंदवली गेली आहे. युरोपीय निर्बंध, जागतिक मंदी आणि राजकीय तणावामुळे हा व्यापार कमी झाला असला, तरी तो पुन्हा वाढवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. मॅक्रॉन यांनी चीनला ‘पॅरिसमध्ये गुंतवणूक करा, आम्ही संधी निर्माण करू’ अशी ऑफर दिली असून, ती चीनच्या दीर्घकालीन आर्थिक धोरणात महत्त्वाची ठरू शकते. युरोपमध्ये आपला प्रभाव वाढवण्याची मोठी संधी चीनला फ्रान्समधून दिसून येत आहे.
🇨🇳🇫🇷 XI TO MACRON: JOIN ME IN BUILDING A MULTIPOLAR WORLD Beijing didn’t waste time dressing it up: Xi Jinping used Macron’s 3-day state visit to openly pitch France on reshaping the global order – not with the U.S., but alongside China. In front of cameras, Xi called on… pic.twitter.com/W7qUtXTQ51 — Mario Nawfal (@MarioNawfal) December 4, 2025
credit : social media and Twitter
तिसरे आणि अधिक संवेदनशील कारण म्हणजे रशिया–युक्रेन युद्ध. पुतिन यांना अप्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपावरून चीन युरोपियन देशांच्या टीकेचा धनी ठरला आहे. ब्रिटन तर चीनविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेत आहे. अशा वेळी फ्रान्ससारख्या प्रभावशाली युरोपीय देशाशी जवळीक साधून, तीव्र होत जाणारा विरोध कमी करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. मॅक्रॉन यांच्या माध्यमातून युरोपसमोर एक ‘समतोल’ चेहरा मांडण्याचा डाव शी जिनपिंग खेळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flying Kremlin: पुतिन यांच्या विमानाने सर्वाधिक ट्रॅक केल्याचा जागतिक विक्रम मोडला; मोदींच्या स्वागताने दौऱ्याचा संदेश ठळक
दरम्यान, मॅक्रॉनही या खेळात मागे नाहीत. त्यांनी चीनमध्ये पोहोचताच युक्रेन युद्धाचा मुद्दा उपस्थित केला आणि युद्ध न थांबवल्यास जग मोठ्या संकटाकडे जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. चीनचा विश्वास संपादन करून, हा विश्वास रशियावर दबाव टाकण्यासाठी वापरण्याची रणनीती फ्रान्स वापरत आहे. कारण चीन हा रशियाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असून, विशेषतः कच्च्या तेलाच्या बाबतीत २०२४ मध्ये चीन सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेत बदल झाला, तर त्याचा थेट परिणाम रशियावर आणि परिणामी युक्रेन युद्धावर होऊ शकतो.b
Ans: तैवान, व्यापार आणि युरोपमधील आपली प्रतिमा सुधारणे हे आहे.
Ans: चीनचा पाठिंबा मवाळ झाला, तर रशियावर दबाव वाढू शकतो.
Ans: मात्र जागतिक राजकारणात बदल झाल्यास त्याचे अप्रत्यक्ष परिणाम भारतावर नक्की होतील.






