इस्त्रायल इराण युद्धात येमेनची एन्ट्री (फोटो- टीम नवराष्ट्र)
Yemen: इराण आणि इस्त्रायल यांच्यात 13 जून पासून संघर्षाला सुरुवात झाली आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इराणच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रांवर मोठे हल्ले केले. तर इराणने रशियाकडे मदत मागितली होती. मात्र रशियाने या प्रकरणात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक देश इराणच्या मदतीला धावून आला आहे.
इराणसोबत आम्ही युद्धात सहभागी होत असल्याचे येमेन देशाने सांगितले आहे. येमेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या युद्धात इराणसोबत सहभागी असल्याचे सांगितले आहे. येमेन देशाच्या घोषणेमुळे आता इस्त्रायल इराण संघर्ष मोठे वळण घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या महायुद्धाची तर ही सुरुवात नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रशियाने इराणची मदत करण्यास नकार दिला आहे. इस्त्रायल इराण वादात रशियाने तटस्थ भूमिका घेतली आहे. येमेन देशाने अमेरिका आणि इस्त्रायल देशांना त्यांची जहाजे आमच्या सागरी सीमेपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यावर येमेन देशाने ही अधिकृत भूमिका घेतली आहे.
अमेरिका आणि इस्त्रायल ही दोन्ही देश एकत्र असल्यास धोकादायक ठरू शकतात असे येमेनचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या मदतीने इस्त्रायल तणाव निर्माण करत आहे. आम्ही त्या दोन्ही देशांना यांच्या सागरी सीमेपासून दूर राहण्याचा सल्ला देतो आहोत. नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील.
इराणने घेतला बदला; 40 मिनिटे इस्त्रायलवर केला महाभयानक हल्ला
इराण आणि इस्त्रायलमध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात अमेरिकेने देखील उडी मारली आहे. अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर हल्ला केला आहे. त्याचा बदला म्हणून इराणने सिरियामध्ये अमेरिकेचे असणाऱ्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. तर इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा बदला इराणने घेतला आहे. इस्त्रायलवर तब्बल 40 मिनिटे महाभयानक अशी क्षेपणास्त्र डागली आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Israel-Iran War: इराणने घेतला बदला; 40 मिनिटे इस्त्रायलवर केला महाभयानक हल्ला, VIDEO पाहून…
इराणचा अमेरिकेवर हल्ला
अखेर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याच्या ३६ तासांनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरियातील अमेरिकेच्या तळावरील हल्ला हा इराणकडून पहिला हल्ला मानला जात आहे. मात्र अद्याप इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हल्ल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यांनी सांगितले होते की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात येईल.