2027 Bajaj Dominar 400 Spotted With New Features  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

Bajaj Dominar 400 चे 2027 मॉडेल दिसले टेस्टिंगदरम्यान! TFT डिस्प्ले, TPMS सह मिळणार नवीन फीचर्स

बजाज डॉमिनार 400 च्या 2027 मॉडेलची टेस्टिंगदरम्यानची छायाचित्रे समोर आली आहेत. नवीन बाईकमध्ये 5-इंच TFT डिस्प्ले, TPMS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे 349.13 सीसी इंजिन कायम राहणार असून 2027 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होऊ शकते.

Atharva Rajopadhye
  • 2027 बजाज डॉमिनार 400 मध्ये नवीन TFT डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

  • TPMS मुळे दोन्ही टायर्समधील हवेचा दाब स्क्रीनवर पाहता येईल.

  • सध्याचे 349.13 सीसी इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स कायम राहतील.

बजाज ऑटो आपल्या Dominar 400 या क्रूझर बाईकमध्ये नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. 2027 मॉडेलची पहिली टेस्टिंगदरम्यानचे फोटोज समोर आले आहेत. या नवीन बाईकमध्ये 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यांसारखी आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या भारतीय वेबसाइटवर या फीचर्सची नोंद केली होती. आता टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या बाईकमुळे नवीन मॉडेलबाबत उत्सुकता वाढली आहे. ही बाईक 2027 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे.

नवीन TFT डिस्प्ले आणि गुगल मॅप्सची सुविधा

2027 बजाज डॉमिनार 400 मध्ये नवीन पल्सर बाईक्समधील 5-इंच TFT डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. या स्क्रीनवर गुगल मॅप्स मिररिंग, लॅप टाइमर, कॉल अलर्ट आणि म्युझिक कंट्रोल्स यांसारख्या सुविधा मिळतील. तसेच वाहनाची RC, इन्शुरन्स आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सेव्ह करण्याची सुविधाही असू शकते. त्यामुळे रायडर्सना प्रवासादरम्यान अनेक गोष्टी एकाच स्क्रीनवर हाताळता येतील.

TPMS आणि सेफ्टी फीचर्समध्ये बदल

नवीन डॉमिनार 400 ही बजाजची TPMS असलेली पहिली मोटरसायकल ठरू शकते. या सिस्टिमच्या मदतीने पुढच्या आणि मागच्या टायरमधील हवेचा दाब TFT स्क्रीनवर पाहता येईल. याशिवाय स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, हॅझर्ड लाइट स्विच, ड्युअल चॅनल ABS आणि वेगवेगळे राइड मोड्स मिळण्याची शक्यता आहे. राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी आणि क्रूझ कंट्रोलचाही समावेश होऊ शकतो.

इंजिनमध्ये बदल होणार नाही

नवीन मॉडेलमध्ये सध्याचे 349.13 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 39.5 bhp पॉवर आणि 7,500 rpm वर 33 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच मिळतो. बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

किंमत आणि लाँचची माहिती

बजाजने एप्रिल 2026 मध्ये डॉमिनार 400 मध्ये 350 सीसी इंजिन सादर करून तिची किंमत 2.03 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली होती. यामुळे आधीच्या 400 सीसी मॉडेलच्या तुलनेत किंमत 37,000 रुपयांनी कमी झाली. 350 सीसीपेक्षा कमी इंजिन कॅपसिटीच्या वाहनांवर 18% GST लागू होतो, तर 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन कॅपसिटीच्या वाहनांवर 40% GST लागू होतो. नवीन मॉडेलमध्ये फीचर्स वाढवूनही हीच इंजिन रचना कायम राहण्याची शक्यता आहे.

Female Reproductive Health: आईपण, पैसा अन् स्त्रीबीजदान! महिलांसाठी ही प्रक्रिया आजही गुप्त का? आरोग्य व्यवस्थेतील पोकळी उघड

Gold Price Outlook : सोनं 1 लाखांच्या खाली येणार? पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव

गोदाघाटावरील अवशेषांची पुरातत्व विभागाकडून पाहणी; ऐतिहासिक नोंदीतून उलगडला इतिहास

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चे 3 व्हेरिएंट समजून घ्या डिटेलमध्ये! किंमत 4.89 लाखांपासून, जाणून घ्या काय आहेत फरक

PM Narendra Modi : विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची भाजप संसदीय कार्यकारी समितीसोबत बैठक; महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकांवर विशेष अधिवेशनात चर्चा