BMW India Targets 20,000 Car Sales in 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

BMW ग्रुप इंडियाचे 2026 मध्ये 20,000 कार विक्रीचे लक्ष्य; इलेक्ट्रिक कारच्या मागणीचा मोठा फायदा

BMW ग्रुप इंडियाने 2026 मध्ये बीएमडब्ल्यू आणि मिनी ब्रँडच्या मिळून 20,000 पेक्षा जास्त कार विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 78 टक्के वाढ झाली असून, 2027 मध्ये एकूण विक्रीत EV चा वाटा 30 टक्क्यांवर नेण्याची कंपनीची योजना आहे.

Atharva Rajopadhye
  • बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने 2026 मध्ये 20,000 कार विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.

  • पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 78 टक्के वाढ झाली आहे.

  • 2030 पर्यंत भारतात वार्षिक 30,000 कार विकण्याची कंपनीची योजना आहे..

भारतातील लक्झरी कार मार्केटमध्ये BMW ग्रुप इंडिया आपले स्थान आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2026 या वर्षात BMW आणि मिनी या दोन्ही ब्रँडच्या मिळून 20,000 पेक्षा जास्त कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2025 मध्ये कंपनीने 18,001 कारची विक्री केली होती. इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी, नवीन मॉडेल्स आणि मिनी ब्रँडच्या विस्तारामुळे यंदा विक्रीत दुहेरी आकडी वाढ होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

लक्झरी कार सेगमेंटमध्ये BMW आणि मर्सिडीज-बेंझ यांच्यात आघाडी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहन नोंदणीच्या आकडेवारीत BMW आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जवळपास 1,000 वाहनांनी पुढे आहे. दुसरीकडे, मर्सिडीज-बेंझने जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान 15,190 कार विकून स्वतःची सर्वोत्तम विक्री नोंदवली आहे.

BMW च्या iX1, i5, i7, 5 सीरिज आणि 7 सीरिज या मॉडेल्सना चांगली मागणी आहे. या कारसाठी सध्या 2 ते 3 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. विशेषतः iX1 साठी ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत पहिल्या सहामाहीत 78 टक्के वाढ होऊन हा आकडा 2,359 युनिटवर पोहोचला. कंपनीच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा जवळपास 26 टक्के आहे.

2027 मध्ये एकूण विक्रीपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा इलेक्ट्रिक कारचा असण्याची कंपनीला अपेक्षा आहे. याशिवाय, मिनी ब्रँडने 2026 मध्ये 1,200 ते 1,500 कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2030 पर्यंत भारतात वार्षिक 30,000 कार विक्रीचा टप्पा गाठण्याचे BMW ग्रुप इंडियाचे उद्दिष्ट आहे. पण परकीय चलनातील चढ-उतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी जानेवारी 2027 पासून कारच्या किमतीत 2 ते 4 टक्के वाढ करणार आहे.

Solapur District Bank Election : जिल्हा बँकेचे थकीत पैसे एक-एक रुपया वसूल करणार; जयकुमार गोरे आक्रमक

Electric Kettle Auto Cut-Off – पाणी उकळल्यावर केटल आपोआप बंद कशी होते?

Paneer Viral Video : चाकूने कापले नाही पनीर, मग आणावी लागली आरी! व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

JK टायरचा ईशान्य भारतात नवा उपक्रम; मेघालयात महिलेकडून चालवले जाणारे पहिले ग्रामीण टायर केंद्र सुरू

Satara News : माण तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील आणि कोतवाल पदे तातडीने भरा; तरुण वर्गाची शासनाकडे जोरदार मागणी