फोटो सौजन्य: AI 
ऑटोमोबाइल

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

बीवायडीचा लक्झरी ब्रँड डेंझा लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला D9 आणि Z9 GT या प्रीमियम मॉडेल्सवर कंपनीचा फोकस राहू शकतो. D9मध्ये 103.36 kWh बॅटरी आणि 520 km पर्यंत WLTP रेंज मिळते, तर Z9 GTच्या टॉप व्हर्जनमध्ये सुमारे 1,140 hp पॉवर असल्याचे रिपोर्ट्स आहेत.

Atharva Rajopadhye
  • बीवायडीचा लक्झरी ब्रँड डेंझा भारतात येण्याच्या तयारीत, D9 आणि Z9 GTवर विशेष लक्ष
  • डेंझा D9मध्ये 103.36 kWh बॅटरीसह 520 km पर्यंत WLTP रेंज मिळण्याची शक्यता
  • Z9 GTच्या टॉप इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये तब्बल 1,140 hp पॉवर असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले

बीवायडी आता भारतात आपल्या प्रीमियम आणि लक्झरी कार पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लक्झरी ब्रँड डेंझा भारतात लवकरच एंट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीवायडीच्या सध्याच्या डायनेस्टी आणि ओशन रेंजपेक्षा वरच्या स्तरावर, तर यांगवांगपेक्षा खाली डेंझाची जागा आहे. सुरुवातीला इम्पोर्ट केलेल्या मॉडेल्सद्वारे भारतीय मार्केटमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

डेंझाची सुरुवात कशी झाली?

डेंझाची सुरुवात 2010 मध्ये बीवायडी आणि डेमलर यांच्या 50:50 जॉइंट व्हेंचरमधून झाली होती. 2012 मध्ये ब्रँडचे नाव वापरात आले. बीवायडीने बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित टेक्नोलॉजी दिली, तर डेमलरने वाहन विकासाचा अनुभव दिला. सप्टेंबर 2024 मध्ये बीवायडीने डेंझाची पूर्ण मालकी मिळवली. सध्या डेंझाकडे इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड मॉडेल्सची रेंज आहे.

D9 ठरणार भारतातील प्रमुख मॉडेल

भारतात डेंझा D9 ही लक्झरी MPV सुरुवातीच्या मॉडेल्सपैकी एक असण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल-स्पेक D9ची लांबी 5,250 mm, रुंदी 1,960 mm, उंची 1,920 mm आणि व्हीलबेस 3,110 mm आहे. यात 103.36 kWh बॅटरी मिळते. सिंगल-मोटर व्हर्जनची WLTP रेंज 520 km पर्यंत, तर ड्युअल-मोटर AWD व्हर्जनची रेंज 480 km पर्यंत आहे. DC फास्ट चार्जिंग कॅपसिटी सुमारे 200 kW आहे.

Z9 GTमध्ये मिळणार जबरदस्त पॉवर

D9सोबत डेंझा Z9 GT देखील भारतात येण्याची शक्यता आहे. हे प्रीमियम इलेक्ट्रिक फास्टबॅक e3 इंटेलिजंट व्हेईकल कंट्रोल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. चीनमध्ये हे RWD EV, ट्राय-मोटर AWD EV आणि प्लग-इन हायब्रिड व्हर्जनमध्ये विकले जाते. टॉप इलेक्ट्रिक व्हर्जनची पॉवर सुमारे 1,140 hp असल्याचे रिपोर्ट्स आहेत. यात सेकंड जनरेशन ब्लेड बॅटरी आणि हाय-स्पीड चार्जिंग टेक्नोलॉजी मिळते.

किंमत आणि प्रतिस्पर्धी कोण?

डेंझा D9ची भारतातील संभाव्य किंमत सुमारे ₹80 लाख ते ₹1 कोटी असू शकते, तर Z9 GTची किंमत ₹1.20 कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. D9चा सामना एमजी M9, टोयोटा वेलफायर, किआ कार्निव्हल आणि लेक्सस LM सारख्या लक्झरी MPVशी होऊ शकतो. त्यामुळे बीवायडी भारतात थेट प्रीमियम लक्झरी सेगमेंटमध्ये मोठी उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम

Satara News: युती केली नसती तर आमचे सात संचालक निवडून आले असते; जयकुमार गोरे

गुन्हा सिद्ध न होताच 77 टक्के कैदी भोगताहेत कारावास; कैद्यांना अजूनही निकालाची प्रतीक्षाच

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मोठी बातमी ! जाणीवपूर्वक हटवली होती राजीव गांधी यांची सुरक्षा; राहुल गांधींचा गंभीर आरोप