Ducati DesertX V2 Adventure Motorcycle Launched in India  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

Ducati DesertX V2 भारतात लाँच; किंमत 19.99 लाख रुपये, डिसेंबरपासून डिलिव्हरी सुरू

डुकाटीने भारतात नवीन DesertX V2 अॅडव्हेंचर बाईक 19.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. 890cc V2 इंजिन, 108.5 bhp पॉवर, 6 रायडिंग मोड्स, कॉर्नरिंग ABS आणि ऑफ-रोड सस्पेन्शन ही तिची वैशिष्ट्ये आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

Atharva Rajopadhye
  • डुकाटी DesertX V2 भारतात 19.99 लाख रुपयांना लाँच झाली.

  • 890cc इंजिनमधून 108.5 bhp पॉवर आणि 92 Nm टॉर्क मिळतो.

  • 6 रायडिंग मोड्ससह बाईकमध्ये कॉर्नरिंग ABS आणि क्विक शिफ्ट 2.0.

इटलीची प्रसिद्ध सुपरबाईक निर्माता कंपनी Ducati ने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन 2026 Ducati DesertX V2 लाँच केली आहे. या अॅडव्हेंचर मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक मॅट स्टार व्हाइट सिल्क या कलरमध्ये सादर केली आहे. देशभरातील Ducati डीलरशिपमध्ये या बाईकसाठी बुकिंग सुरू झाले असून डिसेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यापासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

DesertX च्या दुसऱ्या जनरेशन मॉडेलमध्ये नवीन मोनोकॉक फ्रेम देण्यात आली आहे. ही फ्रेम एअरबॉक्स म्हणूनही काम करते. बाईकमध्ये 21 इंचाचे पुढचे आणि 18 इंचाचे मागचे ट्यूबलेस स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय पुढचा भाग 20 मिमीने खाली ठेवण्यात आला असून 18 लिटरची नवीन पॉलिमर फ्युल टँक देण्यात आली आहे. फ्युल टँकचे संरक्षण करण्यासाठी क्रॅश पॅड्सचाही वापर करण्यात आला आहे.

ऑफ-रोड राइडिंगसाठी खास सस्पेन्शन

या बाईकमध्ये 46 मिमी KYB USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंना सेपरेट हायड्रॉलिक अॅडजस्टमेंटची सुविधा असून पुढच्या चाकाला 230 मिमीपर्यंत सस्पेन्शन ट्रॅव्हल मिळते. मागच्या बाजूला फुल फ्लोटर प्रोग्रेसिव्ह सस्पेन्शन लिंक देण्यात आली आहे. मजबूत रिअर ट्रेलिस सबफ्रेम, डबल साइडेड अॅल्युमिनियम स्विंगआर्म आणि पिरेली स्कॉर्पियन रॅली STR टायर्समुळे ही बाईक ऑफ-रोड राइडिंगसाठी सज्ज झाली आहे. सीटची उंची 840 मिमी आहे.

सुरक्षिततेसाठी 4 स्तरांचे कॉर्नरिंग ABS देण्यात आले आहे. यामध्ये ऑफ-रोड आणि रोड राइडिंगसाठी स्वतंत्र सेटिंग्स आहेत. एंड्युरो आणि रॅली मोडमध्ये ABS पूर्णपणे बंद करण्याची सुविधाही मिळते. यासोबत डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि क्विक शिफ्ट 2.0 स्टँडर्ड देण्यात आले आहे.

890cc इंजिनमधून मिळणार 108.5 bhp पॉवर

नवीन DesertX V2 मध्ये 890cc चे डुकाटी V2 इंजिन दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे त्यांच्या ब्रँडने तयार केलेले आतापर्यंतचे सर्वात हलके ट्विन सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 108.5 bhp पॉवर आणि 7,000 rpm वर 92 Nm टॉर्क निर्माण करते. याला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे 3,000 rpm वरच 70 टक्के कमाल टॉर्क मिळतो.

रायडर्सना स्पोर्ट, टूरिंग, अर्बन, वेट, एंड्युरो आणि रॅली असे 6 रायडिंग मोड्स मिळतात. याशिवाय 5 इंचाचा फुल TFT डिस्प्ले, LED हेडलॅम्प, DRL, क्रूझ कंट्रोल, USB पोर्ट्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे लांबचा प्रवास आणि ऑफ-रोड राइडिंग करणाऱ्यांसाठी ही नवीन बाईक एक आकर्षक ऑप्शन ठरू शकते.

Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Nagpur News : रायझिंग नागपूरसाठी विकासाचा महाआराखडा; ४०० गुंतवणूकदार येणार; चेहरामोहरा बदलणार

वॅगनआर कारमधून आलेल्या चौघांनी अडवली सोन्याची व्हॅन! एमआयडीसीत १६ किलोहून अधिक सोन्याची लुट

India A tour of Nepal: रायझिंग स्टार्समधून बाहेर, आता Team India निघणार नेपाळ दौऱ्यावर! कधी अन् कुठे भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Bangladesh News : ढाक्याच्या राजकारणात खळबळ; भारताला मुस्लिमविरोधी म्हणत बांगलादेशी सभापती हाफिज उद्दीन अहमद यांची टीका