होंडा Alpha EV लाँचपूर्वी 5 कंपन्यांसोबत चार्जिंग नेटवर्कसाठी करार.
Honda Connect अॅपवरून चार्जिंग स्टेशन शोधणे आणि पेमेंट करणे शक्य.
2 डिसेंबर 2026 रोजी नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच होणार.
या पार्टनरशिपची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्जिंग नेटवर्क होंडाच्या Honda Connect डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक SUV वापरणाऱ्या कस्टमर्सना वेगवेगळ्या कंपन्यांचे अॅप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही. Honda Connect च्या माध्यमातून जवळचे चार्जिंग स्टेशन शोधणे, तिथे चार्जर रिकामा आहे की नाही हे तपासणे, चार्जिंग सेशन सुरू करणे आणि डिजिटल पेमेंट करणे शक्य होणार आहे.
या संपूर्ण व्यवस्थेमध्ये ElectreeFi टेक्नोलॉजी पार्टनर म्हणून काम करणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या चार्जिंग कंपन्यांचे नेटवर्क एकाच प्लॅटफॉर्मवर जोडण्याची जबाबदारी या कंपनीकडे असेल. तर जिओ-बीपी, अदानी टोटल एनर्जीज, टाटा पॉवर आणि GO EC या कंपन्या शहरांमध्ये तसेच हायवेवर पब्लिक चार्जिंग स्टेशनची सुविधा देणार आहेत.
होंडा कार्स इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे उपाध्यक्ष कुनाल बेहल यांनी सांगितले की, भारतातील इलेक्ट्रिक वाहन प्रवास सुरू करताना कंपनीचे लक्ष केवळ नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्यावर नाही. तर कस्टमर्सना विश्वासार्ह चार्जिंग व्यवस्था देण्यावरही आहे. चार्जिंग स्टेशन सहज शोधता येणे आणि चार्जिंगची प्रक्रिया सोपी होणे यामुळे इलेक्ट्रिक वेईकल्सचा वापर वाढण्यास मदत होऊ शकते.
जिओ-बीपीचे चेअरमन सार्थक बेहुरिया आणि ElectreeFi चे सीईओ सुमित आहुजा यांनीही या पार्टनरशिपमुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा सहज मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
2 डिसेंबरला मिळणार चार्जिंग नेटवर्कची संपूर्ण माहिती
होंडा Alpha इलेक्ट्रिक एसयूव्हीचे भारतातील लाँच 2 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. याच कार्यक्रमात कंपनी आपल्या चार्जिंग इकोसिस्टमविषयी आणखी माहिती देणार आहे. त्यामुळे गाडीची वैशिष्ट्ये, चार्जिंग नेटवर्क आणि कस्टमर्सना मिळणाऱ्या फेसिलीटीसबाबत त्या दिवशी जास्त स्पष्टता मिळेल.