Jawa Yezdi BSA Nomads Community Jawa Yezdi BSA Nomads Community
ऑटोमोबाइल

Jawa Yezdi BSA Nomads Community : पिढ्यान्‌पिढ्या टिकलेली बाईकची क्रेझ! जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने गाठला 3 लाखांचा टप्पा

Jawa Yezdi BSA Nomads Community : मोटरसायकलप्रेमींना एकत्र आणणाऱ्या जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने भारतभरात ३,००,००० हून अधिक सदस्यांचा टप्पा गाठत आपल्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड पूर्ण केला आहे.

Ankita Karangutkar
  • पिढ्यान्‌पिढ्या टिकलेली बाईकची क्रेझ!

  • बाईकप्रेमींची मोठी एकजूट!

  • जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने गाठला 3 लाखांचा टप्पा

Jawa Yezdi BSA Nomads Community : सणासुदीच्या काळात जावा, येझदी आणि BSA नोमॅड्स कम्युनिटीने भारतभरात 3,00,000 हून अधिक सदस्यांचा टप्पा गाठला असून, आपल्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मोटरसायकल चालवण्याची समान आवड असलेल्या रायडर्सना एकत्र आणणारी नोमॅड्स कम्युनिटी सातत्याने रायडर्सना नवीन ठिकाणे फिरून पाहण्याच्या, अनुभवांची देवाणघेवाण करण्याच्या आणि दीर्घकाळ टिकणारे मैत्रीचे नाते निर्माण करण्याच्या संधी उपलब्ध करून देत आहे.

ही कम्युनिटी अनेक पिढ्यांपासून पुढे चालत आलेल्या उत्साही मालकांच्या परंपरेवर उभी आहे. भारतात जावा आणि येझदीच्या नवीन मोटरसायकलींचे उत्पादन बंद असतानाही, स्वतंत्र मालकांचे ग्रुप, संग्राहक आणि मोटरसायकलप्रेमींनी आपल्या मोटरसायकली, राइड्स आणि एकमेकांसोबत शेअर केलेल्या आठवणींच्या माध्यमातून या ब्रँड्सची ओळख आणि परंपरा जिवंत ठेवली. 2018 मध्ये जावा ब्रँडने भारतात पुन्हा प्रवेश केला, तेव्हा त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या एका दिवसात 1,00,000 हून अधिक बुकिंगची नोंद झाली, यावरून भारतात जावाच्या परंपरेची ताकद आजही कायम असल्याचे दिसून आले.

विविध भागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राइड्स आणि कम्युनिटी उपक्रमांमुळे नोमॅड्स कम्युनिटीचे रूपांतर संपूर्ण भारतात विस्तारलेल्या नेटवर्कमध्ये झाले आहे. यामध्ये विविध शहरे, संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेले रायडर्स एकत्र येतात. राष्ट्रीय आणि प्रादेशिक राइड्स, डीलरशिपच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या राइड्स, सांस्कृतिक अनुभव आणि कम्युनिटी मेळाव्यांमुळे सदस्यांना नवीन ठिकाणे पाहण्याची, इतर मोटरसायकलस्वारांशी जोडले जाण्याची आणि कम्युनिटीसोबतचे नाते अधिक घट्ट करण्याची संधी मिळते. यामध्ये इबेक्स ट्रेल, पंजाब दा टूर, तक्तसांग ट्रेल, ध्रुव कारगिल राइड, ट्रेल अटॅक आणि राइड टू रूट्स यांसारख्या विशेष राइड्सचा तसेच राइड टू गिव्ह बॅक यांसारख्या उपक्रमांचाही समावेश आहे.

क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “आमची परंपरा नेहमीच मोटरसायकलची आवड असलेल्या अनेक पिढ्यांमधील रायडर्सनी पुढे नेली आहे. नवीन मोटरसायकलींचे उत्पादन होत नसतानाही मालक आणि स्वतंत्र कम्युनिटींनी आपल्या मोटरसायकली, राइड्स आणि एकमेकांसोबत शेअर केलेल्या आठवणींच्या माध्यमातून हे नाते कायम जिवंत ठेवले. 2018 मध्ये जावा ब्रँडच्या पुनरागमनाला मिळालेल्या प्रतिसादातून पिढ्यान्‌पिढ्या टिकून असलेल्या या नात्याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली. आज नोमॅड्स कम्युनिटीने 3,00,000 सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे, हा टप्पा जावा, येझदी आणि BSA रायडर्सना एकत्र आणणारी त्यांची आवड आणि आपलेपणाची भावना दर्शवतो. रायडर्सना एकत्र राइड करण्यासाठी, नवीन ठिकाणे शोधण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणारे नाते निर्माण करण्यासाठी आम्ही यापुढेही अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत राहू.”

नोमॅड्स कम्युनिटीचा वाढता विस्तार हा जावा, येझदी आणि BSA रायडर्ससोबत अधिक मजबूत नाते निर्माण करण्यावर या ब्रँड्सचा असलेला सातत्यपूर्ण भर दर्शवतो. नियोजनबद्ध राइड्स, कम्युनिटी कार्यक्रम आणि एकत्रित अनुभवांच्या माध्यमातून रायडर्सना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ही कम्युनिटी मोटरसायकलच्या मालकीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा भाग बनत आहे.

भारतभरात 3,00,000 हून अधिक सदस्य असलेली नोमॅड्स कम्युनिटी अधिकाधिक रायडर्सना एकत्र आणण्यावर आणि त्यांना राइड करण्यासाठी, नवीन ठिकाणे फिरून पाहण्यासाठी व एकमेकांशी जोडले जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आतापर्यंत केलेले प्रवास आणि या प्रवासादरम्यान निर्माण झालेली नाती यांमुळे जावा, येझदी आणि BSA मोटरसायकल मालकीचा अनुभव अधिक एकजुटीचा, आनंददायी आणि कायम स्मरणात राहणारा बनवण्याचे काम ही कम्युनिटी सातत्याने करत आहे.

Cricket News: मैदानावर जय बिस्ताचा धुमाकूळ; 77 रन्स अन्...; 'या' संघाचा दणदणीत पराभव

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

आधार लिंक नाही, ई-केवायसी अपूर्ण; मावळमधील शेकडो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

IND vs NZ: किवींच्या मैदानावर टीम इंडियाची अग्निपरीक्षा! हॅगली ओव्हलची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report

Sinhagad Medical College: कोट्यावधींचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय? हायकोर्टाचा संताप!