JK Tyre Opens Women-Led Rural Centre in Meghalaya  (फोटो सौजन्य-AI एआय)
ऑटोमोबाइल

JK टायरचा ईशान्य भारतात नवा उपक्रम; मेघालयात महिलेकडून चालवले जाणारे पहिले ग्रामीण टायर केंद्र सुरू

जेके टायरने मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे महिलेकडून चालवले जाणारे पहिले ग्रामीण टायर वितरण केंद्र सुरू केले आहे. 1,200 चौरस फुटांच्या या केंद्रात कार, ट्रक, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे टायर मिळतील. कंपनीचा हा उपक्रम ईशान्य भारतातील सर्व 7 राज्यांमध्ये विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

Atharva Rajopadhye
  • मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे जेके टायरचे पहिले महिला संचालित केंद्र सुरू झाले.

  • 1,200 चौरस फुटांच्या केंद्रात विविध वाहनांसाठी टायरचा साठा ठेवण्यात आला आहे.

  • कंपनीचा हा उपक्रम ईशान्य भारतातील सर्व 7 राज्यांमध्ये विस्तारण्याची योजना आहे.

भारतीय टायर उत्पादक कंपनी JK Tyre अँड इंडस्ट्रीजने ईशान्य भारतातील ग्रामीण भागात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. कंपनीने मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे महिलेकडून चालवले जाणारे पहिले ग्रामीण टायर वितरण केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाची संधी मिळण्यासोबतच वाहनधारकांना टायर खरेदी आणि वितरणाची सुविधा जवळच्या परिसरात मिळणार आहे.

कंपनीने या उपक्रमाला 'जेके वुमन रुरल डिस्ट्रिब्युटर' (JKWRD) असे नाव दिले आहे. ईशान्य भारतातील महिलांना वाहन क्षेत्रातील व्यवसायाशी जोडणे आणि ग्रामीण भागात टायरचे वितरण जास्त सोपे करणे हा यामागचा उद्देश आहे. मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे संचालन स्थानिक उद्योजिका बैलांग लिंगदोह नोंगलैत करत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर महिला उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार आहे.

हे वितरण केंद्र सुमारे 1,200 चौरस फुटांच्या जागेत उभारण्यात आले आहे. येथे प्रवासी कार, ट्रक, हलकी व्यावसायिक वाहने तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी टायरचा साठा ठेवण्यात आला आहे. यामध्ये पॅसेंजर कार रेडियल (PCR), ट्रक, लाइट कमर्शियल व्हेईकल (LCV) आणि टू-व्हीलर व थ्री-व्हीलर टायरचा समावेश आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांसोबतच व्यावसायिक वाहन चालक आणि फ्लीट ऑपरेटर्सनाही या केंद्राचा फायदा होऊ शकतो.

जेके टायरचे व्यवस्थापकीय संचालक अंशुमान सिंघानिया यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, महिलांच्या उद्योजकीय कौशल्याला वाहन क्षेत्रातील रिटेल व्यवसायाशी जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील कस्टमरपर्यंत दर्जेदार टायर आणि सेवा पोहोचवण्यावरही कंपनी भर देत आहे.

कंपनीने मागच्या वर्षी ग्रामीण वितरण नेटवर्क वाढवण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. आता त्याचा विस्तार ईशान्य भारतातील सर्व 7 राज्यांमध्ये करण्याची योजना आहे. या भागातील जवळपास 82 टक्के लोकसंख्या ग्रामीण परिसरात राहते. त्यामुळे अशा वितरण केंद्रांना मोठी संधी आहे. नॉन्गस्टॉइनपासून सुरू झालेला हा उपक्रम अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमधील ग्रामीण भागात महिला उद्योजकांसाठी व्यवसायाचे नवे मार्ग उघडू शकतो.

Paneer Viral Video : चाकूने कापले नाही पनीर, मग आणावी लागली आरी! व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

Satara News : माण तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील आणि कोतवाल पदे तातडीने भरा; तरुण वर्गाची शासनाकडे जोरदार मागणी

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय

Bumrah भाऊने स्टाईलच बदलली? न्यूझीलंडविरुद्धचा Jasprit च्या रनअपचा Video Viral

Washim: पाणीटंचाईचे संकट गडद! एकबुर्जी प्रकल्पात ३२ टक्केच जलसाठा; पाणी काटकसरीने वापरण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन