SUV  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ऑटोमोबाइल

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच

भारतीय बाजारात दमदार टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या परवडणाऱ्या SUV शोधत असाल, तर Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Maruti Fronx हे पाच पर्याय पाहण्यासारखे आहेत. या गाड्यांमध्ये दमदार इंजिन, आकर्षक लूक आणि आधुनिक फीचर्स मिळतात.

Riddhi Vanne
  1. कमी किमतीत 5 दमदार टर्बो SUV.

  2. 99 ते 128 bhp पर्यंत इंजिनची ताकद.

  3. किंमत 7.52 लाखांपासून सुरू.

Top 5 Affordable Turbo Petrol SUVs in India: आजकाल बऱ्याच लोकांना टर्बो पेट्रोल इंजिन असलेली गाडी हवी असते. कारण ती पळायला दमदार असते आणि शहरात पण चालवायला मजा येते. तुम्ही पण अशीच गाडी बघत असाल, तर खाली दिलेल्या 5 कॉम्पॅक्ट SUV तुमच्या कामाच्या आहेत. कोणती गाडी कितीला पडते, इंजिन कसं आहे, चांगलं काय आणि वाईट काय, हे सगळं सोप्या भाषेत बघू.

• 1. Hyundai Venue

Venue ही Hyundai ची छोटी SUV आहे. दिसायला भारी आणि टर्बो इंजिनमुळे लोकांना खूप आवडते.

इंजिन - 1.0 लिटर टर्बो पेट्रोल, 118 bhp पॉवर, 172 Nm टॉर्क. 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT चा ऑप्शन मिळतो.

किंमत - 9.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम)

जमेची बाजू - लूक चांगला आहे, फीचर्स भरपूर, इंजिन दमदार

खराब बाजू - किंमत थोडी जास्त वाटते, मागची सीट फारशी आरामदायी नाही, जागा कमी पडते.

• 2. Kia Sonet

Sonet दिसायला फारशी खास नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तरी पण फीचर्स आणि इंजिनमुळे ही गाडी खूप विकली जाते.

इंजिन - 1.0 लिटर T-GDi टर्बो पेट्रोल, 118 bhp पॉवर, 172 Nm टॉर्क. 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT मिळतो.

किंमत - 9.19 लाख रुपयांपासून

जमेची बाजू - डिझाईन, फीचर्स, इंजिन

खराब बाजू - किंमत जास्त, मागची सीट चांगली नाही, डिझाईनमध्ये फार बदल नाही, आतमध्ये काही नवीन वाटत नाही.

• 3. Mahindra XUV 3

XOMahindra ची ही सगळ्यात छोटी SUV आहे, पण ताकदीला अजिबात कमी नाही. आतमध्ये जागा पण भरपूर आहे.

इंजिन - 1.2 लिटर टर्बो पेट्रोल, 128 bhp पॉवर, 230 Nm टॉर्क. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येतो.

किंमत - 7.99 लाख रुपयांपासून

जमेची बाजू - फीचर्स भरपूर, इंजिन खूप पॉवरफूल, स्पेस चांगली, पळायला भारी

खराब बाजू - मागच्या बाजूचा लूक तसाच जुना वाटतो.

• 4. Tata Nexon

Tata ची Nexon पण ताकदीच्या बाबतीत नावाजलेली गाडी आहे. स्पेस आणि फीचर्समध्ये ही पण कुठे कमी नाही.

इंजिन - 1.2 लिटर टर्बो पेट्रोल, 118 bhp पॉवर, 270 Nm टॉर्क. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.

किंमत - 8.99 लाख रुपयांपासून

जमेची बाजू - फीचर्स, दमदार इंजिन, चांगली स्पेस

खराब बाजू - लूकमध्ये काही नवीन नाही, ड्रायव्हिंग तेवढी स्मूथ वाटत नाही.

• 5. Maruti Fronx

Fronx तिच्या स्टायलिश लूकमुळे लोकांना आवडते. Maruti ची गाडी असल्यामुळे मायलेज आणि सर्व्हिसची टेंशन कमी असते.

इंजिन - 1.0 लिटर टर्बो बूस्ट पेट्रोल, 99 bhp पॉवर, 148 Nm टॉर्क. 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक मिळतो.

किंमत - 7.52 लाख रुपयांपासून

जमेची बाजू - लूक, फीचर्स, इंजिन, स्पेस

खराब बाजू - बॉडी थोडी हलकी वाटते

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?

डिलिमिटेशन बिलामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अन् ठाकरे गट आक्रमक

Eknath Shinde on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व खासदारांना महत्त्वाचे निर्देश

Rinku Singh ला लग्नाचे गिफ्ट मिळणार! KKR 'ही' जबाबदारी देणार? इरफान पठाणच्या विधानाने वाढली उत्सुकता

Uttar Pradesh Crime: सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू