RBI Gold Reserve RBI Gold Reserve
Business

RBI Gold Reserve : RBI ची मोठी कामगिरी! तब्बल 60 टन सोनं भारतात परतलं; देशात साठ्याचे प्रमाण किती?

RBI Gold Reserve : देशाच्या परकीय चलन साठ्याचे आणि सोन्याच्या साठ्याचे व्यवस्थापन अधिक भक्कम करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६० टन सोने मायदेशी परत आणले आहे. या महत्त्वाच्या पावलानंतर आरबीआयच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी तब्बल ८४ टक्के सोने आता भारतातच सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Ankita Karangutkar

RBI Gold Reserve : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याची परिस्थिती बरीच घसरताना दिसत आहे. दरांत सातत्याने घसरण सुरुच आहे. या सगळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. गेल्या सहा महिन्यांत, RBI ने परदेशातून सुमारे ६० टन सोनं मायदेशात परत आणलं आहे. यामुळे नेमका काय फायदा झाला? आणि भारताचा तिजोरी सोन्याचा किती साठा वाढला?

आरबीआयच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी सुमारे ८४% साठा आता देशांतर्गत आहे. यापूर्वी हा आकडा ७७% पेक्षा किंचित जास्त होता. याचा अर्थ असा की, भारत आता आपल्या सोन्याचा एक मोठा हिस्सा देशांतर्गत साठवत आहे. जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

सोन्याचा साठा किती वाढला?

RBI कडून आलेल्या अहवालामध्ये दिलं आहे की, मार्च ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ६०.०८ टन सोने भारतात परत आणले आहे. परिणामी, आरबीआयकडे आता एकूण ८८०.५२ टन सोने आहे. यापैकी, सप्टेंबर २०२६ च्या अखेरीस ७४०.१३ टन सोने भारतात राहिले आहे. उर्वरित सोने परदेशात साठवले आहे. पण, यामुळे भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यात वाढ झालेली नाही; केवळ परदेशात साठवलेले सोने भारतात परत आणले गेले आहे.

परदेशातून सोन भारतात का आणलं?

आरबीआयच्या या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत सोन्याच्या साठ्याचे संरक्षण करणे हे आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये तणाव, युद्धे आणि आर्थिक अनिश्चितता कायम आहे. अशा वातावरणात, परदेशात साठवलेले सोने धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भारताला आपल्या सोन्याचा मोठा हिस्सा देशांतर्गत ठेवायचा आहे, जेणेकरून गरज पडल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचा देशाला फायदा होईल.

सोन्याच्या दरांत बरीच घसरण

आजकाल भारतात सोन्याच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. जानेवारीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १.८० लाख रुपये होता, जो आता घसरून सुमारे १.२० लाख रुपयांवर आला आहे. ही भावातील २७% घसरण दर्शवते. पण, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नजीकच्या काळात, म्हणजेच २०२७ पर्यंत, भाव पुन्हा वाढून १.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

IND vs NZ 2nd Test: क्राईस्टचर्चमध्ये भारताचा कसोटी रेकॉर्ड, एकही विजय नाही; Shubman आणि संघाला बदलावा लागेल इतिहास

Hanuman Ansh OTT: ‘हनुमान अंश’चा ओटीटीवर धमाका! 5 भाषांमध्ये होणार रिलीज; जाणून घ्या तारीख अन् प्लॅटफॉर्म

काय सांगताय? आता WhatsApp वर मेसेज शेड्यूल करता येणार? ठरलेल्या वेळी मेसेज पाठवणारे फीचर?

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

Chanakya Niti: स्वतःच्या फायद्यासाठीच करतात संपर्क; स्वार्थी व्यक्ती ओळखण्याची ही आहेत चिन्ह