JOB (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)  JOB (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Career

5 Countries Offering Jobs: परदेशात राहायचंय? मग 'ही' बातमी वाचाच! ५ देश देत आहेत मोफत घर, नोकरी अन् हजारो युरोंची मदत

परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी कॅनडा, इटली, जपान, जर्मनी आणि स्पेनमध्ये विविध संधी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. या देशांमध्ये नोकरी, स्वस्त किंवा मोफत घरे आणि आर्थिक मदतीच्या योजना आहेत.

Riddhi Vanne
  • ५ देशांत परदेशी नागरिकांना नोकरी आणि घराची संधी.

  • काही गावांमध्ये २५ हजार युरोंपर्यंत आर्थिक मदत.

  • अर्जापूर्वी पात्रता आणि अटी तपासणे आवश्यक.

परदेशात जाऊन राहायचं स्वप्न बऱ्याच जणांचं असतं. काही देशांनी परदेशी लोकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्यात. या देशात नोकरीच नाही तर घर आणि सवलती पण जाहीर केल्यात.

• कुशल लोकांना परदेशात मोठी संधी

चांगल्या संधीच्या शोधात बरेचजण परदेशात जायचा विचार करतात. काही देश स्थानिक गरजा आणि लोकसंख्येचा समतोल साधायला परदेशातल्या लोकांना मोठी संधी देतात. या योजनेत सोपी व्हिसा प्रक्रिया, आर्थिक मदतच नाही तर स्वस्तात आणि मोफत घर पण दिलं जातं. टॅक्समध्ये सुद्धा सवलत दिली जाते. नोकरीच्या संधी पण दिल्या जातात. कोणत्या देशात आणि कुठे मिळते अशी संधी?

• या देशात परदेशी लोकांना मोठी संधी

1. कॅनडा -

कॅनडातल्या लहान शहरांमध्ये लोकसंख्या वाढवायच्या हेतूने ग्रामीण आणि उत्तरेकडच्या भागात खास कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. परदेशी लोकांना कायमचं राहायची संधी दिली जाते. त्यासाठी योग्य शहरात नोकरीची संधी पण दिली जाते.

2. इटली -

इटलीतल्या प्रेसिचे किंवा सम्बुका यासारख्या काही छोट्या गावांमध्ये राहायला जायला 25,000 युरोपर्यंत आर्थिक मदतीची सोय करण्यात आली. पण इथे घर विकत घेऊन त्याचं नूतनीकरण करायची जबाबदारी त्याच माणसाची असते.

3. जपान -

जपानमध्ये कमी होत चाललेल्या लोकसंख्येने चिंता वाढली. रिकाम्या घरांसाठी अकिया असा एक उपक्रम तिथे सुरू आहे. या ठिकाणी परदेशी लोकांना मोफत घरं किंवा अगदी कमी दरात घरं दिली जातात. इतकंच नाही तर आर्थिक मदत पण दिली जाते. पण ग्रामीण भागात राहून तिथली जीवनशैली स्वीकारणं गरजेचं आहे.

4. जर्मनी -

जर्मनी या देशात कुशल कामगारांची मोठी गरज आहे. EU Blue Card सारख्या योजना सुरू करण्यात आल्यात. इथे कुशल कामगारांना चांगला पगार, मोफत शिक्षण आणि आरोग्य विमा यासारख्या सोयी दिल्या जातात. पण आधी उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी शोधावी लागते.

5. स्पेन -

युरोपातल्या स्पेनमधल्या पोंगासारख्या काही गावांमध्ये नवीन कुटुंबांना 3,000 युरोपर्यंत मदत आणि मुलांसाठी वेगळा बोनस देण्याच्या योजना असल्याचं सांगितलं जातं. पण बोनस योजना सगळ्यांनाच लागू होत नाही.

• अर्ज करायच्या आधी काय काळजी घ्याल?

अर्ज करायच्या आधी त्या त्या देशांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करा. त्या देशाची स्थानिक भाषा, पात्रता, नोकरीसाठीची अट आणि शर्ती समजून घ्या. त्या देशाच्या दूतावासाला नक्की भेट द्या. योजना समजून घ्या. कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नका. योग्य सल्लागाराची मदत घ्या.म्हणजेच फक्त मोफत घर आणि पैशांच्या मागे धावू नका. आधी नियम, अटी आणि तिथलं राहणीमान नीट तपासा, मगच पुढचं पाऊल टाका.

Farmers Rickshaw Scheme: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षा देण्याचा सरकारचा विचार! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी माहिती

रात्रीच्या अंधारात वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर दगडांचा वर्षाव! समृद्धी महामार्गावर ८ ते १० वाहनांवर दगडफेक

Akshay Kumar:अक्षय कुमारच्या एका अटीमुळे निर्माते नाराज? मोठ्या प्रोड्युसर्सनी चित्रपटात घेण्यास दिला नकार; अभिनेत्याने सांगितले कारण

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिकची खास इलेक्ट्रिक स्कूटर येणार; डिलिव्हरी बॉयंसाठी 50 क्युबिक फूट कार्गो स्टोरेजची सुविधा!

Sankashti Chaturthi Special: थायलंडपासून इंडोनेशियापर्यंत गणपतीचा गौरव! सरकारी बोधचिन्हांपासून चलनी नोटेपर्यंत गणरायाचा ठसा