फोटो सौजन्य - सोशल मीडिया  
Career

CBSE 12 Exam 2027: विद्यार्थ्यांची सायन्सकडेच धाव! इंग्रजीनंतर 'हा' ठरला दुसरा सर्वात पसंतीचा विषय

CBSE Class 12 Exam 2027: सीबीएसई १२वी बोर्ड परीक्षा २०२७ मध्ये १९ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इंग्रजीनंतर केमिस्ट्री दुसरा सर्वाधिक पसंतीचा विषय ठरला आहे.

श्रेया देशमुख

CBSE Class 12 Exam 2027: देशातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये करिअर आणि अभ्यासाबाबतच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2027 मध्ये होणाऱ्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे प्राथमिक आकडे दर्शवतात की विद्यार्थ्यांचा कल सायन्सकडे प्रचंड वाढला आहे. ताज्या अहवालानुसार अनिवार्य विषय असलेल्या इंग्रजी नंतर केमिस्ट्री हा विषय 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या दुसरा पसंतीचा विषय ठरला आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2027 देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत 57 टक्के विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीची निवड केली आहे. गेल्या 8 वर्षांत सायन्स विषयाने लोकप्रियतेच्या बाबतीत कॉमर्सला मागे टाकले आहे. तसेच 2019 च्या तुलनेत 2027 मध्ये केमिस्ट्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे बिझनेस स्टडीज आणि अकाउंटन्सी यांसारखे प्रमुख विषय 32 टक्क्यांवर मर्यादित राहिले आहेत.

प्रमुख विषयांची यादी: इंग्रजी पहिल्या क्रमांकावर, फिजिक्स तिसऱ्या स्थानावर

सीबीएसईच्या तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) नोंदणी आकड्यांवर नजर टाकल्यास प्रमुख विषयांतील विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे पाहता येईल:

इंग्रजी: १८.५ लाख विद्यार्थी (९७% पेक्षा अधिक)

केमिस्ट्री: १०.८ लाख विद्यार्थी (सुमारे ५७%)

फिजिक्स: १० लाख विद्यार्थी (५२.६%)

मॅथेमॅटिक्स: ८.३ लाख विद्यार्थी (४३.४%)

इकोनॉमिक्स: ५.८ लाख विद्यार्थी (सुमारे एक-तृतीयांश)

बिझनेस स्टडीज आणि अकाउंटन्सी: दोन्हीमध्ये प्रत्येकी सुमारे ४.५ लाख विद्यार्थी (२४%)

सायन्सची क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये का वाढत आहे?

मेडिकल (NEET), इंजिनिअरिंग (JEE) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या वाढत्या संधीमुळे विद्यार्थी सायन्सला अधिक प्राधान्य देत आहेत. केमिस्ट्री हा एक कॉमन विषय आहे जे मेडिकल आणि नॉन मेडिकल अशा दोन्ही शाखांमधील विद्यार्थी शिकतात. त्यामुळे या विषयातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे या बदलातही मुली या मागे नाहीत. शिक्षण मंत्रालयांची आकडेवारी सांगते की , गेल्या दहा वर्षांत आर्ट्सच्या तुलनेत सायन्स शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या अधिक राहिली आहे, मात्र सीबीएसईचे हे आकडे सध्या प्राथमिक स्वरूपाचे आहेत. अंतिम यादी येईपर्यंत त्यामध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई १२वी बोर्ड परीक्षा २०२७ मध्ये सर्वाधिक पसंतीचा विषय कोणता ठरला आहे?

अनिवार्य विषय असलेल्या इंग्रजीनंतर (९७% पेक्षा अधिक), केमिस्ट्री (सुमारे ५७%) हा १२वीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा सर्वात पसंतीचा विषय ठरला असून फिजिक्स (५२.६%) तिसऱ्या स्थानावर आहे.

२०२७ च्या सीबीएसई १२वी परीक्षेत एकूण किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत?

प्राथमिक आकड्यांनुसार, २०२७ च्या १२वी बोर्ड परीक्षेत एकूण परीक्षार्थ्यांची संख्या १९ लाखांच्या पुढे गेली आहे.

सायन्स शाखेतील मुलींच्या सहभागाबाबत कोणता बदल दिसून आला आहे?

शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दशकात पहिल्यांदाच १२वीच्या परीक्षेत आर्ट्सच्या तुलनेत सायन्स शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या अधिक राहिली आहे.

Tech news: अ‍ॅपलविरोधात OpenAI चा प्रतिदावा; व्यापार गुपितांच्या वादामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये संघर्ष तीव्र

Ducati New Bike: अ‍ॅडव्हेंचर रायडिंगसाठी Ducati ची नवी बाईक लाँच; किंमत ऐकून व्हाल थक्क

Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar: पाठित खंजीर खुपसण्याचा इतिहास...; काँग्रेसचा शरद पवारांवर जहरी टिका

Land Ownership Dispute: पंतप्रधान मोदींच्या बालमित्राच्या जमिनीचा १९ वर्षांचा तिढा सुटला; अपर तहसीलदारांचा २७ पानी आदेश, असगरभाईंना दिलासा

IND vs NZ Christchurch Test Day 2: दुसऱ्या दिवशी भारतीय संघ गडगडला, ६ विकेट्स गमावले; न्यूझीलंड आघाडीवर