फोटो सौजन्य - एआय career
Career

AI in Polytechnic: तंत्रशिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल! अभ्यासक्रमात केले 'हे' नवीन बदल

AI in Polytechnic: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात AI टूल्स आणि आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे.

श्रेया देशमुख
  • तंत्रशिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल!

  • अभ्यासक्रमात केले 'हे' नवीन बदल

  • विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार

AI in Polytechnic: तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर एआय आधारित कौशल्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि उच्च शिक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध विषयांच्या अभ्यासक्रमात एआय टूल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार

नव्या बदलांनुसार, 'फंडामेंटल्स ऑफ आयसीटी' या विषयात चॅटजीपीटी, ग्रोक, पर्प्लेक्सिटी, जेमिनी, को-पायलट आणि क्लॉड यांसारख्या एआय चॅटबॉटची ओळख करून दिली जाणार आहे. या टूल्सचा उपयोग, त्यांची कार्यपद्धती आणि डिजिटल सहकार्य याबरोबरच गिटहब प्लॅटफॉर्मचा वापर, खाते तयार करणे, रिपॉझिटरी व्यवस्थापन, फाइल अपलोड करणे आणि डिजिटल दस्तऐवज प्रकाशित करणे यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

एआय आणि गिटहबचा वापर वाढविण्यात आला

प्रोग्रामिंग क्षेत्रातील विषयांमध्येही एआय आणि गिटहबचा वापर वाढविण्यात आला आहे. प्रोग्रामिंग इन सी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जावा, पायथॉन आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयांच्या सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये गिटहब आणि एआय प्लॅटफॉर्मशी संबंधित उदाहरणे व असाइनमेंटचा समावेश करण्यात आला आहे.

जावा स्क्रिप्ट विषयात यापूर्वीच्या अँग्युलर जेएसवर आधारित काही घटकांच्या जागी जावा स्क्रिप्ट समाविष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना डायनॅमिक वेबपेज तयार करणे तसेच जावा स्क्रिप्टमधील इनबिल्ट फंक्शन्स आणि ऑब्जेक्ट्सचा वापर शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये रिअॅक्ट नेटिव्ह फ्रेमवर्कची ओळख करून देण्यात आली आहे.

त्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा प्रशिक्षणाचा समावेश केला असून, रिअॅक्ट नेटिव्ह डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट इन्स्टॉल करणे, कॉन्फिगर करणे आणि प्राथमिक मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. या सर्व बदलांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या इव्हन सेमिस्टरपासून करण्याबाबत संस्थांना आवश्यक सूचना मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी दिल्या आहेत.

पारंपरिक अभ्यासक्रमासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सहकार्य, आधुनिक प्रोग्रामिंग आणि प्रत्यक्ष प्रकल्पाधारित शिक्षणाची सांगड घालण्याचा प्रयत्न या बदलांतून करण्यात आला आहे. त्यामुळे पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात कोणी आणि का बदल केले आहेत?

तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि उद्योगांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कौशल्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) अभ्यासक्रमात बदल केले आहेत.

नवीन अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?

विविध विषयांच्या अभ्यासक्रमात एआय (AI) टूल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

अभ्यासक्रमातील या बदलांचा मुख्य उद्देश काय आहे?

विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि उच्च शिक्षणासाठी अधिक सक्षम करणे, हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे.

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

Honda Alpha electric SUV: होंडा अल्फा इलेक्ट्रिक SUV च्या डिझाइनचा खुलासा; 2 डिसेंबरला होणार जागतिक पदार्पण!

कानातले Earbuds आता तुमचे बोलणे लिहून देणार! AI चे भन्नाट फीचर

IND A vs SL A: फायनलसाठी आरपारची लढाई! श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारत सज्ज; सेमीफायनलचा थरार कधी अन् कुठे?

Family: कुटुंबापासून दूर राहताय? नात्यांमध्ये वाढतोय दुरावा? कुटुंबाशी जवळीक टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!