क्राईम

महिन्याभरापूर्वी झालं होत लग्न, नवदाम्पत्याचे बाथरूममध्ये आढळले मृतदेह; काय घडलं नेमकं?

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे. बाथरूममध्ये नवदाम्पत्याचे मृतदेह आढळेल आहे. महिन्याभरापूर्वीच दोघांचं लग्न झालं होत.

वैष्णवी कामडी

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे. एका नवदाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव सागर सुरेश करमळकर (३२) आणि त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६) असे या दाम्पत्याचे नाव आहेत. या दोघांचं लग्न महिन्याभरापूर्वीच झालं होत. या घटनेमुळे आजरा परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित सागर आणि सुषमा दोघेही रविवारी (१५ जून २०२५) दुपारच्या सुमारास आंबोलीत फिरण्यासाठी गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर ते आजरा येथील भावेश्वरी कॉलनीतील आपल्या घरी परतले. रविवारी रात्रीपासून त्यांचा फोन लागत नव्हता. कालांतराने त्यांचे फोन स्विच ऑफ झाले. त्यामुळे मित्रपरिवाराला चिंता वाटू लागली.

सोमवारी १६ जून रोजी सकाळी त्यांच्या मित्रपरिवाराने घरी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. सागर आणि सुषमा राहत असलेल्या घरामध्ये सर्वत्र गॅसचा तीव्र वास येत होता. यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने शोध घेतला तेव्हा दोघेही बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. गॅस गिझरमधून गॅसची गळती झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. सागर करमळकर यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हृदय किती निरोगी? तुमच्या हृदयाबद्दल Smartwatch मधील Heart Health Score काय सांगतो?

Prajakta Gaikwad: नऊवारी साडी, पारंपरिक दागिने अन् नखरेल अदा; प्राजक्ता गायकवाडचा लुक पाहिलात का?

SpaceX Share: प्रत्येक मुलाला मिळणार स्पेसएक्सचे 2 शेअर्स; एलॉन मस्क यांनी सांगितला 'दहा लाख पट' परताव्याचा मोठा फॉर्म्युला

Solapur District Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा क्लीन स्वीप! १८ पैकी १८ जागा जिंकत मोहिते-पाटलांना धक्का

माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस... रिक्षाचालकांनीही नकार दिला अन् रुग्णवाहिकेशी संपर्क तुटला; मंदारच्या वकिलाची हतबलता समोर!