Latur Crime News 
क्राईम

वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर हल्ला,  कुऱ्हाडीने मारण्याची धमकी; नेमकं काय घडलं?

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना निलंगा तालुक्यातील गिरकचाळ येथे घडली आहे.

Dnyaneshwar more

निलंगा : अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना निलंगा तालुक्यातील गिरकचाळ येथे घडली आहे. याप्रकरणी शरद बाबुराव शिंदे, धनराज बाबुराव शिंदे, ट्रॅक्टर चालकासह अन्य व्यक्तींविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राम महसूल अधिकारी राजू पुंडलिकराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी गिरकचाळ येथील मांजरा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार कांबळे आणि ग्राम महसूल अधिकारी तानाजी सूर्यवंशी हे कारवाईसाठी घटनास्थळी गेले. सायंकाळच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळ वाळूने भरलेला विनानंबरचा ट्रॅक्टर आढळून आला. महसूल पथकाने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने काही अंतरावर वाळू रस्त्यावर खाली करून ट्रॅक्टरसह तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर शरद शिंदे आणि धनराज शिंदे घटनास्थळी आले. ट्रॅक्टर का अडविला, यावरून त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी, कमरेच्या बेल्टने आणि दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे. राजू कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा ट्रॅक्टर अडविल्यास कुऱ्हाडीने तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अन्य सहा जणांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. मात्र, मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याच दिवशी तक्रार देता आली नाही, असे कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलिस करीत आहेत.

घटना कुठे आणि कधी घडली?

गिरकचाळ (ता. निलंगा) येथे २४ नोव्हेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या कारवाईदरम्यान हा प्रकार घडला.

महसूल कर्मचाऱ्यांवर काय आरोप करण्यात आले आहेत?

महसूल कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी, कमरेच्या बेल्टने आणि दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल झाला?

शरद बाबुराव शिंदे, धनराज बाबुराव शिंदे, ट्रॅक्टर चालक आणि अन्य व्यक्तींविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लास ABC ज्यूस, त्वचा केसांसोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

अकोल्यात कॉमन ब्रँडिंगअभावी 260 केंद्रांना फटका; सेवा केंद्रांच्या मनमानीला बसणार चाप

Nashik Crime News: प्रेमाच्या वादातून थेट हत्येचा प्रयत्न! नाशिकरोडमध्ये संशयित पोलिसांच्या जाळ्यात

Jay Jay Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट! शंकरने रुहीसमोर ठेवली संसार की स्वामीभक्ती निवडण्याची अट