सौजन्य - सोशल मिडीया 
क्राईम

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ज्ञानेश्वर मोरे
  • सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ
  • पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
  •  सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

बल्लारपूर : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात अनेक जण टोकाचा निर्णय घेत आहेत. अशातच  आता बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जीवन विलास झरेकर असे मृत मुलाचे नाव आहे. सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते.

गुरुवारी जीवनला त्वचा विकाराचा त्रास सुरू झाला. यावर शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत ३- ४ दिवस त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती आहे. मात्र, वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. गावी जाता येत नसल्याचे आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागत असल्याचे समजताच जीवन अत्यंत निराश झाला व रडू लागला. त्यावेळी सर्व मुले बाहेर मैदानात होती, तो ७ ते ८ मिनिटे रडतच होता, त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

सीसीटीव्ही फुटेजवरून उलगडा

सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात असतानाच, ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शाळेतील कॅमेरात कैद झाली आहे. पोलिस व शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत जीवनच्या पालकांना प्रत्यक्ष दाखवले. त्यात तो रडत असून त्यानेच आत्महत्या केल्याचे त्या फुटेजमधून स्पष्ट झाल्याची माहिती रामनगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.

नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर ७२ तासांत कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे हादरलं! न्यायालयाबाहेर बंदूक फेकून हल्लेखोर पसार; मंदार किवळेवरील हल्ल्यामागे कात्रजमधील हत्येची इनसाईड स्टोरी!

ह्युंदाईकडून पॅराऑलंपिक तिरंदाज शीतल देवीला नवी बेयॉन SUV भेट! 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या शीतलदेवीच्या यशाचा गौरव

Travel: हिवाळ्यात फिरण्यासाठी कोकणातील 'हे' आहेत सर्वात सुंदर समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्याचा घ्या मनमुराद आनंद!

दोनदा फ्लॉप अन् तिसऱ्यामध्ये काढला वचपा; Vaibhav Suryavanshi ला सामन्याआधी 'या' दिग्गजाचा कॉल?