संग्रहित फोटो 
क्राईम

नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या

नाशिक शहरातील द्वारका परिसरातील हॉटेल कोर्टयार्डजवळ मित्रांसोबत मद्यप्राशन करत असताना झालेल्या क्षुल्लक वादातून ३८ वर्षीय खासगी वाहन चालकाचा डोक्यात दगड ठेचून अत्यंत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ज्ञानेश्वर मोरे
  • नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार
  • ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या
  • मुंबई नाका पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात

नाशिक : नाशिक शहरातील द्वारका परिसरातील हॉटेल कोर्टयार्डजवळ मित्रांसोबत मद्यप्राशन करत असताना झालेल्या क्षुल्लक वादातून ३८ वर्षीय खासगी वाहन चालकाचा डोक्यात दगड ठेचून अत्यंत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठल नाना पगारे (३८, रा. मुंदडा इलेक्ट्रक बाईक शॉप पाठीमागे, द्वारका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन ते तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत विठ्ठल पगारे हे पेशाने खासगी वाहन चालक होते. गुरुवारी (दि. ८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पगारे आणि त्यांचे काही मित्र घरामधे एकत्र मद्यप्राशन करत होते. दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यात अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने संशयितांनी रागाच्या भरात पगारे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांची हत्या केली आणि तेथून पसार झाले. घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पगारे यांना रात्रभर कोणतीही मदत मिळू शकली नाही. शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे भाचे निलेश भामरे हे पगारे यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. भामरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांची चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांकडून संशयितांची सखोल चौकशी सुरू 

घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मद्यप्राशनादरम्यान झालेल्या वादातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी हत्येचा अधिकृत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तुर्तास आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका