क्राईम

Nanded Crime: खूनाचा बदला खून! १६ वर्षांपूर्वी वडिलांची झाली होती हत्या, २० वर्षीय मुलाने घेतला बदला

नांदेडमध्ये १६ वर्षांपूर्वी वडिलांच्या हत्येचा सूड घेत २० वर्षीय नागेश गवळेने राष्ट्रपाल कपाळे यांची निर्घृण हत्या केली. दुकानात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार केले. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.

वैष्णवी कामडी
  • 2009 मध्ये नागेशच्या वडिलांची हत्या; राष्ट्रपाल आरोपी पण नंतर निर्दोष.
  • सूडाच्या भावनेतून राष्ट्रपालवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला.
  • पोलिसांची जलद कारवाई; तिन्ही आरोपी अवघ्या तीन तासांत ताब्यात.

नांदेड: नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला मुलाने घेतल्याचे समोर आले आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला मुलाने एका व्यक्तीची हत्या करत घेतला आहे. हा धक्कदायक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. हत्या झालेल्या मृतकाचे नाव राष्ट्रपाल तुकाराम कपाळे (वय 39 रा. पंचशीलनगर ) अस आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या तीन तासात करत आरोपीला अटक केली आहे आहे. आरोपी हा केवळ १९ ते २० वर्षांचा आहे.

काय घडलं नेमकं?

२००९ साली आरोपी नागेश गवळे (वय 20 रा.वाघाळा) याचे वडील राजेंद्र गवळे यांची हत्या करण्यात आली होती. या कटात तीन आरोपी सहभागी होते. यात मृतक राष्ट्रपाल कपाळे हा देखील सहभागी होता. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपाल आणि त्यांचे इतर दोन साथीदारांची या हत्येच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यानंतर तो ऑटो चालवून उदरनिर्वाह करायचा, तसेच घरी किराणा दुकान देखील होते. दुसरीकडे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नागेश गवळे हा षडयंत्र रचत होता आणि शेवटी तो दिवस आला.

शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास राष्ट्रपाल हा दुकानात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर आरोपी नागेशने आपल्या इतर दोन साथीदारांना घेऊन तीक्ष्ण हत्याराने राष्ट्रपालच्या शरीरावर वार केले आणि फरार झाले. रक्तबंबाळ झालेल्या राष्टर्पलच्या घटनास्थळी मृत्यू झाला. नागिरकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पंचनामा करत आरोपींचा शोध घायला सुरुवात केली. तपासाची सूत्रे वेगाने फिरवत अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींचे नाव नागेश राजेंद्र गवळे (वय 20.रा शाहूनगर वाघाळा), अभिजीत राणू गजभारे (वय 20 रा.धनेगाव), लकी राजकुमार पारखे (वय 19 रा.गौतमनगर किल्ला रोड) अशी आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे पोलीस तपासात प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

💡Frequently Asked Questions

Que: हत्या कोणी केली?
Ans: नागेश

Que: मृतकाचे नाव?
Ans: राष्ट्रपाल

Que: घटना कुठे घडली?
Ans: नांदेड

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!