संग्रहित फोटो 
क्राईम

कोथरूडमधील महिलेची नऊ लाखांची फसवणूक; चोरट्यांनी एपीके फाईल पाठवली अन्...

कोथरूड भागातील महिलेला सायबर चोरट्यानी एपीके फाईल पाठवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आनाेळखी क्रमांकावरुन पाठवलेली एपीके फाईल त्यांनी उघडली. त्यानंतर त्यांची फसवणूक केली.

ज्ञानेश्वर मोरे
  • राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • कोथरूडमधील महिलेची नऊ लाखांची फसवणूक
  • चोरट्यांनी एपीके फाईल पाठवून घातला गंडा

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सतत नागरिकांना आवाहन केले जात आहे मात्र घटना कमी होताना दिसत नाही. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोथरूड भागातील महिलेला सायबर चोरट्यानी एपीके फाईल पाठवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आनाेळखी क्रमांकावरुन पाठवलेली एपीके फाईल त्यांनी उघडली. त्यानंतर त्यांची फसवणूक केली.

अशाच पद्धतीने सिंहगड रस्ता भागातील एकाची देखील सायबर चोरट्यांनी फसवणूक केली होती. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका मोबाइल वापरकर्त्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. त्या गृहिणी आहेत. ५ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्या घरात होत्या. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविण्यात आली. एपीके फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांचा मोबाइल क्रमांकातील गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन तक्रारदार महिलेच्या दोन बँक खात्यांमधून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख रुपये लांबविले.

बँक खात्यामधून पैसे परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत. अनोळखी क्रमांकावरून पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडू नका. दिवाळीत शुभेच्छा संदेश पाठविण्यात येतात. अनोळखी क्रमांकावरुन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आलेला संदेश उघडल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका