Love Marriage Dispute फोटो सौजन्य AI  Love Marriage Dispute फोटो सौजन्य AI
क्राईम

Love Marriage Dispute : वैजापूरमध्ये प्रेमविवाहावरून राडा! थेट पोलीस ठाण्यात दोन कुटुंबांत हाणामारी

वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्यात प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील १४ जणांविरुद्ध शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

sanman jadhav
  • दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये आधीपासूनच नाराजी

  • पोलिसांसमोरच दोन कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांशी वाद

  • वीरगाव पोलिसांकडून सखोल तपास सुरू

Love Marriage Dispute : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर मध्ये प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या वादाने टोक गाठले. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद चक्क वीरगाव पोलीस ठाण्यातच हाणामारीपर्यंत पोहोचला. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट आमनेसामने आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलगा-मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये आधीपासूनच नाराजी

या विवाहाच्या मुद्द्द्यावरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबांतील सदस्य वीरगाव पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी प्रेमविवाहाच्या विषयावरून दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला वादावादी व आरोप-प्रत्यारोप सुरू असताना काही वेळातच परिस्थिती चिघळली.

पोलिसांसमोरच दोन कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांशी वाद

दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिस ठाण्यातच हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांसमोरच दोन कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांशी वाद घातल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

वीरगाव पोलिसांकडून सखोल तपास सुरू

दरम्यान, या प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार अक्षय बदने यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही कुटुंबांतील एकूण १४ जणांविरुद्ध शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संदीप रक्ताटे, मयूर रक्ताटे, तेजस रक्ताटे, किरण रक्ताटे, हौशीराम रक्ताटे, संगीता रक्ताटे, दादासाहेब रक्ताटे, कार्तिक सोमवंशी, सत्यजित सोमवंशी, विकास सोमवंशी, बाळासाहेब सोमवंशी, दशरथ सोमवंशी, रवींद्र सोमवंशी व नवनाथ सोमवंशी यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राजेंद्र भालेराव करीत आहेत.

CJP on Delimitation Bill: काँग्रेस इंडिया आघाडीनेतर सीजेपीचाही डिलीमीटेशन बिलाला विरोध; अभिजीत दिपकेंचे मोठं विधान

OR Code कसे काम करते?

Afghanistan Blast: अफगाणिस्तान हादरलं! शाळेजवळील घरात साठवलेल्या डायनामाइटचा भीषण स्फोट; 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 97 जण जखमी

Health tips: दिवसाची सुरुवात करा 'या' तीन ड्रायफ्रूट्सने, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

iPhone Security Warning: iPhone युजर्स सावधान! एका क्लिकमध्ये वैयक्तिक माहिती धोक्यात; Telegram CEO यांनी दिला इशारा