फोटो सौजन्य - Social Media 
Entertainment

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची 'अम्मा' काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे म्हैसूर येथे निधन झाले असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. १९५८ मध्ये गायन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये सुमारे ४८ हजार गाण्यांना आवाज दिला.

दिवेश चव्हाण
  • 'राधा प्यार दे' ही त्यांची हिंदीतील लोकप्रिय गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
  • आपल्या यशाचे श्रेय संगीतकार व गीतकारांनाही देत असत.
  • एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे निधन झाले. म्हैसूर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वाने एक सुमधुर आणि अजरामर आवाज गमावला आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९५८ मध्ये एस. जानकी यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी 'मिस ५८' या चित्रपटासाठीही गायन केले. त्यानंतर हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. कारकिर्दीत त्यांनी सुमारे ४८ हजार गाण्यांना आवाज दिल्याचे मानले जाते. 'यार बिना चैन कहाँ रे', 'बोल बेबी बोल रॉक अँड रोल' आणि 'राधा प्यार दे' ही त्यांची हिंदीतील लोकप्रिय गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.

एस. जानकी यांना भारतीय सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. मात्र, दक्षिण भारतीय कलाकारांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. संगीतविश्वात त्या प्रेमाने 'अम्मा' या नावाने ओळखल्या जात. आपल्या गायनकलेला त्या ईश्वराची देणगी मानत आणि आपल्या यशाचे श्रेय संगीतकार व गीतकारांनाही देत असत.

एस. जानकी आणि दिग्गज गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची जोडी भारतीय संगीतसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. २०१७ मध्ये त्यांनी गायनातून निवृत्ती जाहीर केली. म्हैसूर येथे झालेला त्यांचा अखेरचा संगीत कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाल्यास, १९५९ मध्ये त्यांनी व्ही. रामप्रसाद यांच्याशी विवाह केला. १९९७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतींचे निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्णा ऑडिओ व्यवसाय सांभाळत होता. जानेवारी २०२६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचाही मृत्यू झाला होता. आता एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिरूरमध्ये वकिलाचीच केली गेली 1.90 कोटींची फसवणूक; जमीन व्यवहारात घातला गंडा

IBM US Visa : अमेरिकेतील भारतीयांना दणका!'परत जा नोकरी सोडा' IBM ने बंद केली US व्हिसा,Green Card Sponsorship; आता काय होणार?

Ramayana Movie :२७ देशांमध्ये ‘रामायण’चा डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने रचला इतिहास; भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम

पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क