( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)  
Entertainment

Pyaade Trailer: जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री! ‘प्यादे’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता वाढली

Pyaade Trailer:जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांच्या ‘प्यादे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईत झालेल्या खास सोहळ्यात संपूर्ण टीमने ट्रेलर लॉन्चचा आनंद साजरा केला.

अमृता यादव

Pyaade Trailer: अभिनेता जिमी शेरगिल आणि अभिनेत्री प्रनूतन बहल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्यादे’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका खास सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. शायनिंग मून पिक्चर्स प्रस्तुत या सोहळ्याला चित्रपटाचे मुख्य कलाकार जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांच्यासह लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा आणि निर्माते रिंकू सिंह उपस्थित होते. संपूर्ण टीमने एकत्र येत ट्रेलर लॉन्चचा आनंद साजरा केला. ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘प्यादे’च्या ट्रेलरमध्ये दिसणार चित्रपटाचं अनोखं विश्व

‘प्यादे’चा ट्रेलर प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देतो. यातील व्यक्तिरेखा आणि कथेची पार्श्वभूमी चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करते. जिमी शेरगिल यांचा दमदार पडद्यावरील वावर आणि प्रनूतन बहलचा खास अंदाज यामुळे ही जोडी लक्षवेधी ठरत आहे. दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

जिमी शेरगिल म्हणाले, 'प्यादे' माझ्यासाठी रंजक प्रकल्प

चित्रपटाबद्दल बोलताना जिमी शेरगिल म्हणाले, “‘प्यादे’ हा माझ्यासाठी एक रंजक प्रकल्प होता. या चित्रपटाचं वेगळं विश्व आणि मला साकारायला मिळालेली व्यक्तिरेखा यामुळे मी या सिनेमाकडे आकर्षित झालो. एक अभिनेता म्हणून मला नेहमी अशा कथा करायला आवडतात, ज्या मला काहीतरी नवीन शिकवतात आणि नव्याने शोध घेण्याची संधी देतात. या चित्रपटाने मला ती संधी दिली. शेखर आणि संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. आता ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे, त्यामुळे त्यांना हा चित्रपट किती भावतो आणि ते त्याच्याशी कसे जोडले जातात, हे पाहण्याची उत्सुकता आहे.”

प्रनूतन बहलसाठीही ठरला खास अनुभव

प्रनूतन बहलनेही चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “‘प्यादे’चा भाग होणं हा माझ्यासाठी खरोखरच खूप खास अनुभव होता. प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला काही ना काही शिकवते आणि या भूमिकेमुळे मला माझ्यातील एका वेगळ्या पैलूचा शोध घेता आला. जिमी सरांसोबत स्क्रीन शेअर करणं हा देखील खूप काही शिकवणारा अनुभव होता. आम्ही या चित्रपटासाठी मनापासून मेहनत घेतली आहे आणि आता प्रेक्षकांना आमच्या या मेहनतीची एक झलक पाहायला मिळणार आहे, याचा खूप आनंद आहे.”

शेखर एस. झा यांची खास कथा मोठ्या पडद्यावर

लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा यांच्यासाठी ‘प्यादे’ हा खास चित्रपट आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “‘प्यादे’ ही माझ्या मनाच्या खूप जवळची कथा आहे. एक चित्रपट निर्माता म्हणून आपण कागदावर जे स्वप्न रंगवतो, तेच जेव्हा प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत होतं, तेव्हा मिळणारा आनंद काही औरच असतो. जिमी आणि प्रनूतन यांनी आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये खूप खोली आणि प्रामाणिकपणा आणला आहे. माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून या चित्रपटासाठी आपलं सर्वोत्तम देणाऱ्या संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांचे मी मनापासून आभार मानतो. हा ट्रेलर म्हणजे प्रेक्षकांसाठी आम्ही काय घेऊन येत आहोत, याची फक्त एक छोटीशी झलक आहे.”

निर्माते रिंकू सिंह यांनी व्यक्त केला आनंद

निर्माते रिंकू सिंह यांनीही चित्रपटाच्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “‘प्यादे’ला प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रवास खूप पॅशन, मेहनत, समर्पण आणि टीमवर्कने भरलेला होता. सुरुवातीपासूनच आमचा या कथेवर विश्वास होता आणि तिला योग्य न्याय देण्यासाठी उत्तम कलाकारांची टीम एकत्र आणण्याची आमची इच्छा होती. जिमी शेरगिल सर आणि प्रनूतन बहल यांची साथ, त्यासोबत शेखर सरांची दृष्टी यामुळे हा प्रवास आणखी खास झाला. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे, याचा आनंद आहे. संपूर्ण टीमने ज्या प्रेमाने आणि आपुलकीने हा चित्रपट बनवला आहे, तेवढंच प्रेम प्रेक्षकांकडूनही मिळेल, अशी आशा आहे.”

‘प्यादे’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

महागड्या सिल्क साड्यांची चमक कायम ठेवायची आहे? रंग फिका पडू नये म्हणून 'या' पद्धतीने घ्या काळजी

Apple प्रेमींसाठी धमाका! iPhone 16 आणि 17 Pro Max वर जबरदस्त डील; किंमती ऐकून व्हाल थक्क

MeitY Recruitment 2026: GATE स्कोअरवर थेट केंद्र सरकारची नोकरी! इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयात पदभरती सुरू

IND vs NZ: यशस्वी जायसवालच्या नावे लज्जास्पद रेकॉर्ड! SENA देशात शून्यावर बाद होणारा सहावा खेळाडू, विराटलाही सोडले मागे

Mandar Kiwale Attack Case: शिवाजीनगर न्यायालय हल्ला प्रकरणात आणखी तिघांना अटक; एकूण आरोपींची संख्या ९ वर